How to Download AADHAR Card Online ऑनलाइन आधार कार्ड कसे काढायचे हे या पोस्टमधून आज बघणार आहोत.
आधार कार्ड काय आहे? (What is Aadhar Card)
The Unique Identification Authority of India अर्थातच UDAI ही एक वैधनिक संस्था आहे किंवा Authority आहे, जी लोकांना आधार कार्ड उपलब्ध करून देते. आधार कार्ड ची सुरुवात आपल्या देशात ही 28 जानेवारी 2009 रोजी आली आणि आता पर्यन्त म्हणजे फेब्रुवारी 2021 पर्यन्त जवळपास UIDAI मार्फत 1,284,528,669 आधार कार्ड वितरित केले गेले आहेत. आधार हा एक ओळखीचा पुरावा म्हणून वैध धरला जातो. आधार कार्ड च वापर हा अनेक ठिकाणी आपण करू शकतो जसे की बँकेत जर आपल्याला खाते उघडायचे असेल तर आधार कार्ड हे अनिवार्य दस्ताऐवज आहे. आधार कार्ड नंबर हा 12 अंकी असतो तो ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो.
आधार कार्ड काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतात? (Aadhar Card Required Documents)
आधार कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला फक्त ओळखीचा म्हणजे तुमचं पत्ता याचाच पुरावा लागतो, त्या साथी तुम्ही शाळेची TC, महावितरणाचे विद्युत बिल सुद्धा वापरू शकता.
ऑनलाइन आधार कार्ड कसे डाऊनलोड करायचे? How to Download AADHAR Card Online
ऑनलाइन आधार कार्ड काढण्यासाठी सोपी पद्धत तुम्हाला आम्ही येथे सांगणार आहोत.
सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या Official वेबसाइट वर जावे लागेल नंतर तुमच्या समोर खालील प्रकारे होम पेज ओपन होईल.
नंतर तुम्हाला थोड खाली स्क्रोल कराव लागेल व नंतर GET AADHAR वर क्लिक कराव लागेल.
GET AADHAR वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ ओपण होईल त्या वर DOWNLOAD AADHAR वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
नंतर तुमच्या समोर EAADHAR चे OFFICIAL वेबपेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 14 अंकी ENROLMENT ID किंवा VIRTUAL ID टाकायचा आहे व CAPTCHA VERIFICATION कोड टाकून SEND OTP बटन वर क्लिक करायचे आहे, नंतर तुमच्या आधार रजिस्टर नंबर वर तुम्हाला एक OTP म्हणजे One Time Password येईल तो टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
नंतर तुमच्या समोर तुमचे आधार कार्ड दिसेल ते तुम्हाला DOWNLOAD BUTTON वर क्लिक करून डाऊनलोड करता येईल आणि एकदा डाऊनलोड आले की तुम्हाला ते ओपन करावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला PASSWORD विचारलं जाईल तेथे तुम्हाला तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर CAPITAL मध्ये आणि तुमचं जन्म वर्ष टाकून ते ओपेन होईल. जसे की तुमचे नाव SAGAR असेल आणि तुमचे जन्म वर्ष 1995 असेल तर तुमचं आधार पासवर्ड हा SAGA1995 असा होईल.
आधार कार्ड डाऊनलोड करण्याची दुसरी पद्धत
मित्रांनो, वरील पद्धतीने तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड करण्याची दुसरी पद्धत देखील सांगणार आहो.
- सर्वात आधी तुमच्या मोबाइल मधील PLAY STORE ओपन करा.
- नंतर MAADHAR म्हणून सर्च करा
- MAADHAR चे OFFICIAL APP तुमच्या मोबाइल मध्ये इंस्टॉल बटन वर क्लिक करून इंस्टॉल करून घ्या
- APP इंस्टॉल झाल्यानंतर तुमचं 12 अंकी आधार कार्ड नंबर टाका, तुमच्या मोबाइल नंबर एक OTP पाठवला जाईल व तो ऑटोमॅटिक च सत्यपित केल्या जाईल.
- हे सर्व झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचे आधार कार्ड दिसेल