नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रणीत महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी कर्ज माफीची घोषणा केली होती आणि नियमित पणे कर्जाची भरणार्यांना ५० हजारची मदत केल्या जाईल असे महाविकास आघाडी सरकार ने आश्वासन दिले होते.
पण मात्र मागच्या वर्षी अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत शेतकर्यांना करणे सरकारला शक्य झाले नाही. आणि, सध्याला सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर कल म्हणजे दिनांक १० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत मदत देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा – शेतकर्यांना मिळणार १ लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत
काल दिनांक १० मार्च २०२१ रोजी विधान परिषदेत याबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्व हा विरोधी पक्षाकडून सतत विचारला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती ठीक झाल्यानंतर ही मदत केली जाईल, असे अजित पवार म्हणाले विधान परिषदेत बोलतांना म्हणाले.
हेही वाचा – अल्पभूधारक शेतकर्यांसाठी ठाकरे सरकारच “विकेल ते पिकेल अभियान”
आणि तसेच यावेळी शेतकऱ्यांना कर्ज घेणे आणि परतफेड करणे सुद्धा सोपे होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली. तसेच अंतरिम पीककर्जही शून्य टक्के व्याजाने मिळणार घोषणा सुद्धा त्यांनी केली. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची महारवाची घोषणा राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामधून करण्यात आली होती.
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा. (येथे क्लिक करा)