Atal Pension Scheme 2021 – सर्वांनाच मिळेल ५००० रुपयांपर्यंतचे पेंशन – वाचा सविस्तर

 अटल पेंशन योजना २०२१ ही  ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी जाहीर करण्यात आली होती. परंतु, आता ज्यांचे लोकांचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहे, असे 18 ते 40 वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करुन प्रत्येक महिन्याला ५००० रुपयापर्यंत पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. आणि या योजनेत रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीस वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागेल. अटल योजनेतील पेन्शनची रक्कम ही तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर आणि त्यांच्या वयावर अवलंबून असेल.

atal pension yojana in marathi


अटल पेंशन योजना २०२१ ची वैशिष्टे

या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी 1000, 2000, 3000, 4000 किंवा जास्तीत 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरु केली. या योजनेसाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे सेव्हिंग्ज अकाऊंट, आधार कार्ड,व मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.


हेही वाचा – सौरकृषी पंपा साठी असा करा अर्ज

अटल पेंशन योजना आहे तरी कशी ?

जितक्या लवकर तुम्ही या योजनेत सहभागी व्हाल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर कोणतिही व्यक्ती वयाच्या 18 वर्षी अटल पेंशन योजनेत सहभागी झाली तर त्यास वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 रुपये पर्यन्त पेन्शन मिळू शकते, मात्र यासाठी संबंधित व्यक्तीस प्रती महिना 210 रुपये या योजनेत जमा करणं आवश्यक आहे. म्हणजेच रोज तुम्ही जर 7 रुपये जमा केले तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. जर तुम्ही दर महिन्याला 42 रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळणार. त्याचप्रमाणे 2000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये, 4000 रुपये पेन्शनसाठी दरमहा 168 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे जमा करावे लागतील.


हेही वाचा – शेतकर्‍यांना ट्रॅक्टर साठि मिळणार सरकार कडून सव्वा लाखाचे अर्थसाहाय्य

तुमचे योगदान कसे तपासायचे?

तुमचे contribution म्हणजेच योगदान तपासण्यासाठी ग्राहक APY मोबाईल अॅप्लिकेशन किंवा APY आणि NPS Lite app वापरु शकतात. APY युझर्सकडून पहिल्या 5 ट्रान्झॅक्शन तपासण्यासाठी कोणतेही शुल्क तुमच्या कडून घेतले जाणार नाही. तसेच युझर्स आपले ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटस आणि e-PRAN विनाशुल्क डाऊनलोड करु शकतात. तसेच आपले APY ट्रान्झॅक्शन पाहण्यासाठी युझर्सला APY NSDL CRA या वेबसाईटवर जाव लागेल. इथे लॉग-इन करण्यासाठी मात्र PRAN आणि सेव्हिंग अकाऊंटचा तपशील देन आवश्यक आहे. जर तुमच्याकडे PRAN चा तपशील उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमचे नाव, अकाऊंट क्रमांक आणि जन्म तारखेचा तपशील देखील वापरु शकता. तसेच युझर्स UMANG या अॅपच्या माध्यमातून देखील एकूण जमा रकमेचा तपशील, ट्रान्झॅक्शन तपशील आणि e-PRAN कार्ड डाऊनलोड करु शकतात.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.