नमस्कार मित्रांनो, थोड्याच दिवसांनी होळी येणार आहे. होळी आली म्हणजे रंगला खूपच महत्व प्राप्त होते हे आपल्याला माहितीच आहे. घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती करणे खूप सोपे आहे. आणि तेच जर व्यावसायिक पातळीवर करायच म्हटलं तर थोड फार प्रक्षिशन आवश्यक असते. पण एकदा का प्रक्षिशन करून घेतलं म्हणजे महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय म्हणजेच घृहउद्योग ठरू शकतो.
माणूस आणि समाजाला जोडून ठेवणारा सन म्हणजेच होळी. मात्र होळी साजरी करत असतांना ती पर्यावरण पूरक कशी साजरी केली जाईल या कडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. होळीचा आनंद एक-मेकांसोबत वाटून घेत असतांना त्या सोबतच अपघात, आणि पर्यावरणाची हानी व्हयाला नको या कडे सुद्धा दुर्लक्ष नको. अश्या बाबी नक्की टाळायला पाहिजेत.
हेही वाचा – गावात कंपनी सुरू करून शेंनापासून बनवा रंग आणि कमवा लाखो
होळीचा सन मार्च महिन्यातच म्हणजे 28 मार्च ला आहे. उत्तर भारतामध्ये होलीच्या दिवशी तर आपल्या महाराष्ट्रात रंगपंचमी च्या दिवशी रंगांचा उत्सव साजरा केला जातो. बाजारामद्धे रासायनिक पद्धतीने तयार केले गेलेले रंग उपलब्ध असतात परंतु त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात जसे की त्वचेचे रोग. डोळ्यामध्ये सुद्धा हा रंग गेला तर ते हानिकारक ठरू शकते. या साठीच रासायनिक रंग नेहमी टाळायला पाहिजे.
आपल्या ग्रामीण भागामद्धे उपलब्ध असलेल्या वेग-वेगळ्या वनस्पति पासून आपण घरीच रंग बनवू शकतो आणि ह्या रंगाचे काही दुष्परिणाम सुद्धा नसतात ते हानिकारकही नसतात. झाडांची फुले, पाने. साल, तसेच बिया अश्या वेगवेगळ्या वंनस्पतींपासून आपण घरी पर्यावरणपूरक रंगांची निर्मिती ही करू शकतो. जसे की हळदी पासून पिवळा रंग बनतो, पळसाच्या फुलापासून केशरी रंग बनतो, निलगिरीच्या साली पासून तपकिरी रंग, तसेच निळी पासून निळा रंग आपण बनवू शकतो.
हेही वाचा- सावधान !! शेतातून जाणारे रस्ते रोखल्यास होऊ शकते कारवाई
घरगुती बनवलेल्या रंगांची वैशिष्टे
- घरी बनवलेले नैसर्गिक रंग हे ओले व कोरडे अश्या दोन्हीही पद्धतीने आपण वापरू शकतो.
- घरगुती रंग अतिशय मुलायम असतात. त्या पासून इजा होण्याची श्यक्यता नसते.
- हे रंग धुवायलाही सोपे असतात.
- कपड्यावर दाग पडत नाहीत.
- नैसर्गिक रंग खूप सुरक्षित असतात त्यांचे काहीही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत.
घरगुती रंग निर्मिती साठी लागणारे साहित्य
- मोठे भांडे, टोपले किंवा एखादे पातेले, शिजवण्यास गॅस, चमचा, मिक्सर इत्यादि
- रंगाचे स्त्रोत- हळद, पाळसाची फुले, मेहंदी, नीळ, झेंडूच्या झाडाची फुले, इत्यादि निसर्गात खुपशे आशे स्त्रोत आहे की ज्यांच्या पासून आपण रंगांची निर्मिती करू शकतो.
घरगुती रंग तयार करण्याची पद्धत
- कोणताही एक घटक घ्या जसे की पाळसाची फुले
- त्यांना रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी गॅस वर उकाळा
- उकळून झाल्यावर ते पानी एखाद्या भांड्यात गळून घ्या
- आणि तुमचं नैसर्गिक रंग तयार !!