आचार्य बलशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार असे म्हणतात. (Acharya Balshastri Jambhekar) मराठी वृत्तपत्राचे जनक, समाजसुधारक, इतिहास संशोधक म्हणून सुद्धा त्यांना ओळखल्या जाते. (Acharya Balshastri Jambhekar Information in Marathi)
Balshastri Jambhekar |
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी पोम्भुर्ले या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हे गंगाधर शास्त्री जांभेकर होते, तसेच आईच नाव सगुणाबाई होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासून हुशार असल्याने त्यांचे शिक्षक त्यांना “बाल बृहस्पती” असे म्हणत. वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी रामदास,तुकाराम,मोरोपंत,वामन यांच्या कविता आत्मसात केल्या व संस्कृत, गीतापाठण, पदपठन व पंचकाव्याचा अभ्यास त्यांनी केला.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या बद्दल काही महत्वाची माहिती आपण पाहू.
{tocify} $title={Table of Contents}
हे पण वाचा – जगन्नाथ शंकरशेठ
अध्यापणाचे कार्य
- सुरूवातीला विद्यार्थी दशेत असतांना त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.
- १८३२ मध्ये सरकारतर्फे अक्कलकोट युवराजच्या शिक्षकपदी नेमणूक झाली.
- १८३४ मध्ये सुरू झालेल्या एल्फिस्टन कॉलेज मध्ये त्याच वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदी नियुक्ती झाली
- शिक्षकांच्या अध्यपन वर्गाचे संचालक व मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे इंस्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली.
वाङमय
- बाळशास्त्री जांभेकर हे इतिहास संशोधक होते.
- १८४६ मध्ये ते प्राचीन शिलालेखांच्या वाचनासाठी वनवेश्वर येथे गेले होते.
- बाळशास्त्री जांभेकर यांनी गणित,इतिहास,भूगोल,मानसशास्त्र,व्याकरण या विषयांवर लेखन केले.
- १८३६ मध्ये बाळव्याकरन – भूगोलविदया, १८३५ – ज्योतिषशास्त्र, १८३२ – इंग्लंड देशाची बखर, १८३७ सारसंग्रह, १८३८ – नीतीकथा, १८४६ – हिंदुस्थानचा इतिहास, १८४९ – हिंदुस्थांनचा प्राचीन इतिहास इत्यादि ग्रंथाचे लेखन केले.
विविध जबाबदार्या
- १८३० मध्ये त्यांची बॉम्बे नेटीव्ह एड्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी पदी नियुक्ती. (२ वर्षांनंतर सेक्रेटरी पदी नियुक्ती)
- कुलाबा वेधशाळेचे संचालक होते तसेच ते जूनियर कॉलेजचे प्राचार्य होते.
- लंडनच्या जीओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई (Geographic Society Mumbai) शाखेचे ते संचालक होते.
सामाजिक कार्य
- जांभेकरांनी कुटुंब पोषनाची जबाबदारी दुय्यम मानून समाज सेवेला प्राधान्य दिले.
- सामाजिक क्षेत्र – वृत्तपत्रीय क्षेत्रात करी क्रण्याची प्रेरना त्यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या कडून घेतली.
- गणित,इतिहास,भूगोल,व्याकरण,नीतिशास्त्र या विषयांवर पुस्तके लिहून शिक्षणाचा पाया घातला.
- बालविवाह, पुनर्विवाह, सतीप्रथा याबद्दल सर्वप्रथम लिखाण केले.
- स्त्री शिक्षणाचे ते प्रथम पुरस्कर्ते होते.
- विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला.
- विद्याभिलासी व्हा विद्याभ्यास करा.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर थोडक्यात
नाव | बाळ जांभेकर |
टोपणनाव | आचार्य |
जन्म | ६ जानेवारी १८१२ |
मृत्यू | १८ मे १८४६ |
वडील | गंगाधर शास्त्री |
आई | सगुणाबाई |
मराठी वृत्तपत्राचे जनक
दर्पण
दर्पणचा पहिला अंक हा ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला. हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. सुरूवातीला ते ४ महीने पाक्षिक व नंतर ते साप्ताहिक झाले. २० जुन १८४० मध्ये दर्पण चा शेवटचा अंक निघाला. १ जुलै १८४० मध्ये दर्पण बंद झाले, त्यानंतर ते वृतपत्र लिमिटेड सर्विस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल यात विलीन झाले. दर्पण बृतापत्राचा खप हा ३०० होता आणि विशेष म्हणजे त्या वेळी कोणत्याही वृतपत्राचा खप हा ४०० पेक्षा जास्त नव्हता. दर्पण ची वार्षिक वर्गणी फक्त ६ रुपये होती.