जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचे मूळ नाव मुरकुटे होते. | Jagannath Shankar Sheth Information in Marathi.
{tocify} $title={Table of Contents}
कौटुंबिक पार्श्वभूमी
- वडील – शंकरशेठ
- आई – भवानीबाई (आईच्या स्मरणार्थ भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली)
- जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचे घराने दैवज्ञ (ब्राह्मण) (सोनार) होते.
- वडील शंकरशेठ यांनी मुंबई येथे जवाहीर्यांच्या व्यवसायात खूप मोठी संपत्ति कमावली होती.
- लहान असतांनाच आई वारली तर त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी वडील वारल्याने लहान वयातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली.
- व्यापारामुळे ब्रिटिश अधिकार्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते.
- त्या काळात फारशी शाळा महाविद्यालयं नसतांना सुद्धा त्यांनी मराठी-इंग्रजी-संस्कृत भाषेवरती प्रभुत्व मिळविले.
शैक्षणिक कार्य
- शिक्षणाशिवाय जनतेचा उद्धार होणार नाही, असे त्यांनी इंग्रज अधिकार्यांना बजावले.
- एल्फिस्न्स्टन यांनी मुंबई प्रांतासाठी एक शैक्षणिक योजना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या सहय्याने राबविली,
बॉम्बे नेटीव्ह एजूकेशन सोसायटी ची स्थापना
- एल्फिस्न्स्टन ने १८२२ मध्ये हैंडशाळा व शाळापुस्तक मंडळी काढले याचेच पुढे बॉम्बे नेटीव्ह एजूकेशन सोसायटी (Bombay Native Education Society) मध्ये रूपांतर झाले.
- शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती.
जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषवलेली पदे
- १८५० ते १८५६ या कलावधीत ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.
- म्यूनिसिपल कमिशन वर सदस्य म्हणून नेमणूक झाली होती.
- १८३५ ला जे.पी (Justice of Peace) पदावर नेमणूक. (जे.पी म्हणजेच जनतेला न्याय मिळावा म्हणून राजाने नेमलेला प्रतींनिधी)
- मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. (First Fellow Of Mumbai University)
- १८६१ साली मुंबई विधी मंडळावरती निवड होणारे पहिले हिन्दी सदस्य.
जगन्नाथ शंकरशेठ यांच्या विषयी थोडक्यात
नाव | जगन्नाथ उर्फ नाना |
जन्म | १० फेब्रुवारी १८०३ (ठाणे) |
मृत्यू | ३१ जुलै १८६५ |
वडील | शंकरशेठ |
आई | भवानीबाई |
इतर
- नानांनी १८५७ ला मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह “बादशाही नाट्यगृह” बांधले
- आचार्य जावडेकर– ‘लोकांच्या वतीने सरकरसोबत बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील ते पहिले पुढारी होते’ असे म्हटले आहे.