पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. MSP 2021-22 (किमान आधारभूत किंमत 2021-22)
MSP 2021-22 |
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने सन 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (MSP) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे.
भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी (MSP) मोदी सरकार द्वारे जाहीर करण्यात आली आहे.
किमान आधारभूत किंमत 2021-22 (MSP 2021-22)
पीक | 2020-21 ची किमान आधारभूत किंमत | 2021-22 ची किमान आधारभूत किंमत | 2021-22 साठी उत्पादन खर्च | किमान आधारभूत किंमत वाढ |
---|---|---|---|---|
उडीद | 6000 | 6300 | 3816 | 300 |
कापूस मध्यम | 5515 | 5726 | 3817 | 211 |
कापूस मोठा | 5825 | 6025 | – | 200 |
कारळे | 6695 | 6960 | 4620 | 235 |
ज्वारी मालदांडी | 2640 | 2758 | – | 118 |
ज्वारी संकरीत | 2620 | 2738 | 1825 | 118 |
तीळ | 6855 | 7307 | 4871 | 452 |
तूर | 6000 | 6300 | 3886 | 300 |
नाचणी | 3295 | 3377 | 2251 | 82 |
बाजरी | 2150 | 2250 | 1213 | 100 |
भात | 1868 | 1940 | 1293 | 72 |
भात ग्रेड अ | 1888 | 1960 | – | 72 |
भूईमूग | 5275 | 5550 | 3699 | 275 |
मका | 1850 | 1870 | 1246 | 20 |
मूग | 7196 | 7275 | 4850 | 79 |
सूर्यफूल | 5885 | 6015 | 4010 | 130 |
सोयाबीन | 3880 | 3950 | 2633 | 70 |
सन 2021-22 साठी खरीप पिकांसाठी एमएसपीमधील वाढ अखिल भारतीय स्तरावरील सरासरी उत्पादन खर्चाच्या (COP) किमान 1.5 पट पातळीवर MSP निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सन 2018-19 च्या घोषणेनुसार एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. शेतकर्यांना वाजवी मानधन मिळावे या उद्देशाने एएमसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित सर्वाधिक परतावा बाजरी (85%), उडीद (65%) आणि तूर (62%) या पिकांवर अंदाज आहे.