Pradhanmantri Suraksha Vima Yojana 2024 | PMSBY Maharashtra | Suraksha Bima Yojana Online Application | Pradhanmantri Suraksha Bima Yojana Maharashtra Bank | Pradhanmantri Suraksha Bima Yojana Form PDF | PMSBY pdf
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2015 साली जाहीर केली होती, त्यानंतर 8 मे 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्याची औपचारिकरित्या सुरुवात केली. देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील लोकांना अपघात विमा उपलब्ध करून दिला जातो. सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, सरकारकडून विमा मिळवण्यासाठी, देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना वर्षाला फक्त 12 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Pradhanmantri Suraksha Vima Yojana बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, उद्देश, अर्ज प्रक्रिया आणि फायदे तरी विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
PM Suraksha Bima Yojana 2024
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने या पॉलिसीमध्ये त्याच्या अपघाताचा विमा काढला आणि तो व्यक्ति मरण पावला, तर त्या व्यक्तीने विमा काढलेली रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला कव्हर म्हणून दिली जाते. एखाद्या व्यक्तीचा जर रस्त्यावर अपघात किंवा इतर कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम सरकार कडून दिल्या जाईल, आणि जर एखादी व्यक्ती अपघातामुळे अपंग झाली म्हणजे हात किंवा पाय मोडला तर त्या व्यक्तिला सरकार कडून 1 लाख रूपयांचा विमा कवर म्हणून दिल्या जाईल. त्यामुळे सर्व सामान्य लोकांसाठी ही योजना खूपच लाभदायक आहे.
PM Kisan नोंदणी झाली सुरू येथे क्लिक करा
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश
PM Suraksha Bima Yojana Highlight
योजनेचे नाव | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना |
---|---|
कोणी सुरू केली | पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी |
केव्हा सुरू केली | सन 2015 ला |
लाभार्थी | देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिक |
उद्देश | अपघात विमा प्रदान करणे |
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना समाप्ती
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ हा वयाच्या 70 वर्षापर्यंत मिळू शकतो. जर लाभार्थीचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्या व्यक्तीसाठी बंद केली जाईल. जर लाभार्थीने बँक खाते बंद केले असेल, तर त्या परिस्थितीतही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बंद केली जाईल. आणि लाभार्थीच्या खात्यात जर प्रीमियम भरण्यासाठी पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यास, या प्रकरणात देखील या योजनेतील खाते बंद केले जाईल.
PMSBY अंतर्गत मिळणारी रक्कम
विमा स्थिति | विम्याची रक्कम |
---|---|
व्यक्तीचा मृत्यू झाल्यास | 2 लाख रुपये |
दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्यास, किंवा दोन्ही हातपाय मोडल्यास किंवा हातापायाने काम न केल्यास, किंवा एका डोळ्याची दृष्टी कमी झाल्यास, किंवा एखाद्या हाताने किंवा पायाने काम करणे बंद केल्यास | 2 लाख रुपये |
एका डोळ्याची पूर्ण दृष्टी गेल्यास किंवा हात कामातून गेल्यास | 1 लाख रुपये |
Pradhanmantri Suraksha Bima Yojana चे फायदे
- या योजनेचा लाभ देशातील सर्व वर्गातील लोकांना दिला जाईल, परंतु विशेषतः देशातील मागास आणि गरीब घटकांना लाभ देण्यात येईल.
- एखाद्या व्यक्तीचा रस्ता अपघातात किंवा इतर कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास. त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा सरकारकडून दिला जाईल.
- कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास, 1 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
- जर तो अपघातामुळे तात्पुरता अपंग झाला असेल तर त्याला एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
- Pradhanmantri Suraksha Vima Yojana अंतर्गत पॉलिसीधारकाला वार्षिक 12 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तरच तो विमा संरक्षित करण्याचा हक्कदार असेल.
- या व्यतिरिक्त, जे व्यक्ति खाजगी किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकारच्या विमा योजनांसाठी पैसे भरण्यास सक्षम नसतील तर ते सर्व या योजनेसाठी पात्र आहेत.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे नूतनीकरण दरवर्षी एका वर्षासाठी कव्हरसह केले जाईल. म्हणजे दरवर्षी 12 रुपये प्रीमियम भरून.
- विशेषतः देशातील ग्रामीण भागात राहणारे लोक. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2024 (Suraksha Vima Yojana Mahiti) साठी पात्र आहेत.
पीएम सुरक्षा बिमा योजनेसाठी पात्रता
- अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 70 वर्षे असावे आणि यापेक्षा जास्त नसावे.
- उमेदवाराकडे चालू स्थितीतिल बचत बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराने पॉलिसी प्रीमियमच्या ऑटो डेबिटसाठी संमती फॉर्मवर स्वाक्षरी करावी.
- संपूर्ण एका वर्षाची प्रीमियमची रक्कम दरवर्षी 31 मे रोजी तुमच्या खात्यातून कापली जाईल.
- बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी बंद पडेल.
- प्रीमियम न भरल्याबद्दल पॉलिसीचे नूतनीकरण करता येणार नाही.
PM Suraksha Vima Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक खाते पासबुक
- वय प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकार फोटो
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अर्ज प्रक्रिया
देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- तुम्हाला जर PDF अर्ज डाऊनलोड करायचा असेल तर अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
- मुखपृष्ठावर तुम्हाला Forms या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या लिंक वर क्लिक करावे लागेल. आणि नंतर तुम्हाला Application Form या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2024 चा pdf (PM Suraksha Bima Yojana Pdf) अर्ज उघडेल. तुम्हाला तो अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
- अर्ज डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला तो भरून आणि अर्जाला आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून बँक शाखेत जमा करावा लागेल.
- अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना 2024 साठी अर्ज करू शकता.
अर्जाची स्थिति तपासण्याची प्रक्रिया
- अर्जाची स्थिति तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
- मुखपृष्ठावर तुम्हाला अर्जाची स्थिति तपसा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
- नवीन पेज वर तुम्हाला Application Number टाकून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
- नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिति उघडेल.
राज्यानुसार टोल फ्री क्रमांक पाहण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- मुखपृष्ठ उघडल्यावर तुम्हाला Contact या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- नवीन पेज वर तुम्हाला State Wise Contact Number या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आणि राज्य निवडावे लागेल.
- नंतर तुमच्यासमोर निवडलेल्या राज्याचा टोल फ्री क्रमांक दिसेल.
Pradhanmantri Suraksha Bima Yojana Beneficiaries List 2024
- लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- मुखपृष्ठ उघडल्यावर तुम्हाला लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर नवीन पृष्ठावर तुम्हाला राज्य निवडून जिल्हा आणि ब्लॉक निवडावा लागेल.
- नंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभार्थी यादी महाराष्ट्र उघडेल.
हे वाचा – कुकुट पालन योजना
Contact Information
या पोस्टद्वारे, आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती सांगितली आहे. तुम्हाला अजून सुद्धा काही अडचण असल्यास तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. 18001801111/1800110001
Important Links
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारे नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.