आम आदमी विमा योजना | आम आदमी विमा योजना क्लेम फॉर्म pdf | आम आदमी विमा योजना मराठी माहिती | आम आदमी विमा योजना महाराष्ट्र | महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना | aam admi bima yojana maharashtra
महाराष्ट्र सरकार कडून sjsa.maharashtra.gov.in या ऑनलाइन पोर्टल वर आम आदमी विमा योजना 2024 (Aam Aadmi Vima Yojana) साठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. आम आदमी विमा योजना ही 18-59 वयोगटातील ग्रामीण भागातील सीमान्त शेतकरी तसेच भूमिहीन मजुरांसाठी केंद्र पुरस्कृत विमा आणि शिष्यवृत्ती योजना आहे (2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल). तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाइन पोर्टल वर जाऊन तुम्हाला आम आदमी विमा योजनेसाठी लागणारा pdf अर्ज डाऊनलोड करावा लागेल त्याबद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून सांगितली आहे तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.
आम आदमी विमा योजना 2024
आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार कडून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्यापैकी केंद्र पुरस्कृत आणि महत्वाची योजना म्हणजे आम आदमी विमा योजना (aam admi bima yojana) होय. 18 ते 59 या वयोगटातील आणि ग्रामीण भागात राहणारे भूमिहीन शेतमजुर तसेच सर्व सिमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आम आदमी विमा योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून राबविल्या जाते.
Aam Admi Bima Yojana Maharashtra
योजना | महत्वाची माहिती |
---|---|
योजनेचे नाव | आम आदमी विमा योजना 2024 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
उद्दिष्ट | विमा आणि शीषवृत्ती |
लाभार्थी | महाराष्ट्रातील नागरिक |
आम आदमी विमा योजनेसाठी पात्रता
आम आदमी विमा योजना महाराष्ट्र 2024 (Aam Aadmi Vima Yojana Maharashtra)साठी नोंदणी करण्यासाठी सर्व उमेदवारांनी खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:-
- आम आदमी विमा योजना ही 18-59 वयोगटातील ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर तसेच सिमांत शेतकरी यांच्या साठी आहे. (2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल)
- आम आदमी विमा योजना योजनेअंतर्गत आकारला जाणारा प्रीमियम रु. 200/- प्रति सदस्य प्रति वर्ष आहे आणि यापैकी 50% राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते.
आम आदमी विमा योजनेचे फायदे
महाराष्ट्रातील आम आदमी विमा योजनेचे संपूर्ण फायदे खाली दिले आहेत:-
- नैसर्गिक मृत्यू आल्यास :- आम आदमी विमा योजने अंतर्गत नोंदणी केली असल्यास आणि त्या व्यक्तीचा नैसर्गिक रित्या मृत्यू झाल्यास 30000 रु ची रक्कम त्याच्या परिवाराकडे हस्तांतरित केल्या जाईल.
- अपघात झाल्यास :-
- 1) अपघातात मरण पावल्यास 75,000 रुपये.
2) अपघातामुळे विकलांग झाल्यास 75,000 रुपये.
3) अपघातात दोन्ही डोळे आणि दोन अवयव गमवल्यास 75,000 रुपये.
4) अपघातात एक डोळा आणि कोणताही एक अवयव गमवल्यास 37,000 रुपयाचा विमा राज्य सरकार कडून हस्तांतरित केल्या जाईल.
शैक्षणिक लाभ
सदस्याच्या ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या २ मुलांना भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून प्रति तिमाही प्रति मुलास रूपये ३००/- शिष्यवृत्ती मिळेल. या योजनेबाबतची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे राहीलः-
- शासनाकडून विम्याच्या हप्त्याची रक्कम दिल्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत नोंदणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र शासन यांच्या नावाने “मास्टर पॉलिसी” निर्गमित करेल.
- या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे भरपाईबाबतचे अर्ज तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ॲन्ड जी एस युनिटकडे पाठवावेत. या संदर्भातील भरपाईचे धनादेश भारतीय आयुर्विमा महामंडळ संबंधित लाभार्थ्याच्या नावाने निर्गमित करेल.
- शिष्यवृत्ती अनुदेय विद्यार्थ्याची ओळख तलाठी करतील व ज्या सदस्यांची मुले शिक्षण शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरतील, त्यांचे अर्ज संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतील व जिल्हाधिकारी या अर्जाची यादी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पी ॲन्ड जी एस युनिटकडे पाठवतील. या यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, सदस्याचे नाव, मास्टर पॉलिसी नंबर आणि सदर सदस्याचा नंबर इ.बाबींचा समावेश असेल. भारतीय आयुर्विमा महामंडळ विद्यार्थ्यांच्या यादीसह धनादेश जिल्हाधिका-यांकडे देईल. जिल्हाधिकारी सदरच्या रकमेचे वितरण तहसिलदारामार्फत संबंधित विद्यार्थ्यांना करतील.
- या योजने अंतर्गत सदस्य झालेल्या व्यक्तीस राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या अन्य विमा योजनांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
Aam Admi Vima Yojana Application Form
तुम्हाला जर आम आदमी विमा योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर त्या साठी तुम्हाला आम आदमी विमा योजनेसाठी लागणारा पीडीएफ अर्ज खालील लिंक वरुण डाऊनलोड करावा लागेल आणि त्या अर्जाला आवश्यक कागदपत्र जोडून जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार, संजय गांधी योजना/तलाठी कार्यालयात जमा करावा लागेल.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा, आणि दररोज नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.