महाराष्ट्र राज्य सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी Aapli Chawdi पोर्टल लॉंच केलेले आहे. आपली चावडी पोर्टल च्या माध्यमातून शेतीशी संबंधित सातबारा उतारा, Property Card, Jamin Mojani इत्यादि संबंधित संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाइन चेक करता यते. Aapli Chawdi ची अधिकृत वेबसाइट digitalsatbara.mahabhumi.gov.in आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला आपली चावडी पोर्टल वर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा लाभ कसा घ्या या बद्दल सविस्तर सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
Aapli Chawdi Portal वर 7/12 पाहण्याची प्रक्रिया
तुम्हाला जर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Aapli Chawdi Portal वर Online Satbara किंवा Digital Satbara पहायचा असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही पाहू शकता-
- सातबारा रेकॉर्ड तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Aapli Chawdi च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल. मुखपृष्ठावर तुम्हाला सातबारा विषयी(7/12) या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल. आणि Captcha Code टाकून आपली चावडी पहा बटन वर क्लिक करावे लागेल.
- बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सातबारा (7/12) विषयी चे रेकॉर्ड उघडेल.
- दिलेल्या रेकॉर्ड मध्ये तुम्हाला पहा लिंक वर क्लिक करावे लागेल.
आपली चावडी पोर्टल च्या माध्यमातून तुम्ही मालमत्ता पत्रक देखील ऑनलाइन तपासू शकता.
- मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Aapli Chawdi Portal वर जावे लागेल.
- तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल. मुखपृष्ठावर तुम्हाला मालमत्ता पत्रक विषयी (Property Card) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर विभाग, जिल्हा, कार्यालय, गाव निवडावे लागेल. नंतर Captcha Code टाकून आपली चावडी पहा बटन वर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुमच्यासमोर मालमत्ता पत्रक विषयी (Property Card) चे रेकॉर्ड उघडेल.
- या रेकॉर्ड वर दिलेल्या पहा बटन वर तुम्हाला क्लिक करावे लागले.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मालमत्ता पत्रक विषयी चे संपूर्ण रेकॉर्ड डाऊनलोड होईल.
Aapli Chawdi Portal वर मोजणी विषयी चे रेकॉर्ड कसे चेक करावे?
- आपली चावडी पोर्टल वर मोजणी विषयी चे रेकॉर्ड पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Aapli Chawdi Portal वर जावे लागेल.
- वेबसाइट वर गेल्यानंतर मुखपृष्ठावर तुम्हाला मोजणी विषयी (Mojni) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल.
- नंतर Captcha Code भरून आपली चावडी पहा बटन वर क्लिक करावे लागेल.
- बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मोजणी विषयी चे रेकॉर्ड उघडेल.
- नंतर तुम्हाला पहा बटन वर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर मोजणी विषयी चे संपूर्ण रेकॉर्ड तुमच्या समोर डाऊनलोड होईल.
- वरील प्रकारे तुम्ही Aapli Chawdi पोर्टल च्या मदतीने मोजणी विषयी चे रेकॉर्ड ऑनलाइन पाहू शकता.
Aapli Chawdi Portal FAQ
Aapli Chawdi डिजिटल नोटिस बोर्ड काय आहे?
आपली चावडी डिजिटल नोटिस बोर्ड हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने तयार केलेले एक वेब पोर्टल आहे ज्यावर महाराष्ट्र राज्यातील नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व प्रकारच्या नोंदी ऑनलाईन तपासू शकतात.
Aapli Chawdi ची अधिकृत वेबसाइट काय आहे?
Aapli Chawdi ची अधिकृत वेबसाइट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ आहे.
Aapli Chawdi Portal केव्हा सुरू झाले?
आपली चावडी पोर्टल ऑगस्ट 2022 मध्ये सुरू झाले.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर फॉलो करा.