Ativrushti Nuksan Bharpai 2023: या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार 73 कोटी 60 लाखांची नुकसान भरपाई, कार्यवाही सुरू

Ativrushti Nuksan Bharpai 2023: शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यात अतिवृष्ट जन्य पाऊस परिस्थिति निर्माण झाली होती काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली. या मुळे शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे खूप मोठे नुकसान झाले आणि सरकार कडून Ativrushti Nuksan Bharpai 2023 मिळावी या आशेत संपूर्ण शेतकरी होते, त्यांच्या साठी आता आनंदाची बातमी आहे शेतकर्‍यांसाठी 73 कोटी 60 लाखांची नुकसान भरपाई राज्य शासनाने जाहीर केली आहे की Nuksan Bharpai 2023 कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे या बद्दल सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

मागील वर्षी अतिवृष्टी मुळे शेतकर्‍यांच्या शेत पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागला सरकार कडून Ativrushti Nuksan Bharpai 2023 मिळेल या आशेत शेतकरी होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मागीलवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी मुळे शेतपिकांचे आणि फळबागांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या मध्ये 33% किंवा या पेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 450 शेतकर्‍यांना 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांची Nuksan bharpai ऑनलाइन पद्धतीने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

Ativrushti Nuksan bharpai 2023 मध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे?

मित्रांनो पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश या नुकसान भरपाई मध्ये आहे कोणत्या तालुक्यातील किती गावांना Nuksan Bharpai 2023 मिळणार आहे हे खाली दिले आहे:

भोर तालुका

  • बाधित गावे 78
  • शेतकरी 523
  • बाधित क्षेत्र 165.66 हेक्टर
  • नुकसान भरपाई ची मदत- 23 लाख 10 हजार

वेल्हा तालुका

  • बाधित गावे 2
  • शेतकरी 11
  • क्षेत्र 1.2 हेक्टर
  • नुकसान भरपाई ची मदत- 39 हजार रुपये

मावळ तालुका

  • बाधित गावे 7
  • शेतकरी 114
  • क्षेत्र 24 हेक्टर
  • नुकसान भरपाई मदत- 3 लाख 26 हजार.

हवेली तालुका

  • बाधित गावे 104
  • शेतकरी 7 हजार 490
  • क्षेत्र 3146.19 हेक्टर
  • नुकसान भरपाई ची मदत- 8 कोटी 33 लाख 2 हजार.

खेड तालुका

  • बाधित गावे 34
  • शेतकरी 1 हजार 947
  • क्षेत्र 1081.41 हेक्टर
  • नुकसान भरपाई- 2 कोटी 2 लाख 23 हजार रुपये.

आंबेगाव तालुका

  • बाधित गावे 89
  • शेतकरी 9 हजार 779
  • क्षेत्र 2646.85 हेक्टर
  • नुकसान भरपाई- 4 कोटी 96 लाख 69 हजार,

जून्नर तालुका

  • बाधित गावे 176
  • शेतकरी 22 हजार 591
  • क्षेत्र 14 हजार 556.35 हेक्टर
  • नुकसान भरपाई- 24 कोटी 51 लाख 46 हजार

शिरुर तालुका

  • बाधित गावे 67
  • शेतकरी 4 हजार 734
  • क्षेत्र 1 हजार 969.54 हेक्टर
  • नुकसान भरपाई 4 कोटी 56 लाख 66 हजार रुपये,

पुरंदर तालुका

  • बाधित गावे 146
  • शेतकरी 27 हजार 841
  • क्षेत्र 9 हजार 332.40 हेक्टर
  • नुकसान भरपाई- 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये.

दौंड तालुका

  • बाधित गावे 30,
  • शेतकरी 2 हजार 8
  • क्षेत्र 818.57 हेक्टर
  • नुकसान भरपाई- 2 कोटी 14  लाख 80 हजार

बारामती तालुका

  • बाधित गावे 101
  • शेतकरी 8 हजार 417
  • क्षेत्र 3480.28  हेक्टर
  • नुकसान भरपाई 5 कोटी 52 लाख 20 हजार रुपये

अशी एकूण 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये Nuksan Bharpai 2023 ची रक्कम आहे.

याशिवाय जून ते ऑगस्ट 2022 या कलावधीत नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतकर्‍यांना एकूण 3 कोटी 14 लाख 3 हजार रुपये देण्यात आली आहे.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवन्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.