Property Rights: मित्रांनो, वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क असतो का? तुम्हाला सुद्धा हा प्रश्न संभ्रमात टाकत असेल बरेचदा आपण समाजामध्ये ऐकतो की मुलीला मुला पेक्षा कमी हक्क असतात. आज या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण या पोस्ट मध्ये कायदा काय सांगतो हे सुद्धा सांगणार आहोत. विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचावी.
हिंदू उत्तराधिकार कायदा काय म्हणतो?
मालमत्तेवरील हक्क आणि हक्काच्या तरतुदींसाठी हा कायदा 1956 मध्ये लागू करण्यात आला होता. यानुसार वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही तेवढाच हक्क आहे जितका मुलाचा असतो. हा उत्तराधिकार कायदा 2005 मध्ये बदलून मुलींच्या हक्कांचे बळकटीकरण करण्यात आले. ज्यामध्ये वडिलांच्या मालमत्तेवर मुलीच्या हक्काबाबत कोणतीही शंका दूर करण्यात आली होती. याचाच अर्थ असा की वडलांच्या संपत्तिवर मुलीचा आणि मुलाचा समान हक्क असतो.
मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकत नाही?
जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने जमीन विकत घेतली असेल तसेच एखादे घर बांधले किंवा विकत घेतले असेल, तर वडील ज्याला पाहिजे त्याला ही मालमत्ता देऊ शकतात. आपली कमावलेली संपत्ती स्वतःच्या इच्छेने कोणालाही देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजे वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही.
वडिलांच्या मालमत्तेवर विवाहित मुलीचा हक्क
2005 च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला वारस म्हणजेच समान वारस म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांना संपत्तीचा वारसा हक्क आहे. त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजेच लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो.