Buy Land on Moon: चंद्रावर जमीन खरेदी करण्याबाबत तुम्हाला उत्सुकता आहे का? असेल तर असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आहात. जसजसे नवनवीन शोध लागत आहेत तशी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. आपण कधी तरी न्यूज चॅनल वर ऐकले असेल की सुशांत सिंह राजपूत ने चंद्रावर जमीन घेतलेली आहे, तसेच शाहरुख खानची एक फॅन दरवर्षी चंद्रावर जमीन विकत घेऊन ती शाहरुख खान ला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट देते. पण खरच चंद्रावर जमीन विकत (Buy land on Moon) घेणे शक्य आहे का? आणि असेल तर ती कशी विकत घेतली जाऊ शकते? या बद्दलच सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून सांगणार आहोत, म्हणून विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.
How to buy Land on Moon in India
चंद्रावर जमीन खरेदी करण्याआधी तुम्हाला आम्ही एक महत्वाची गोष्ट सांगतो. जेव्हा अमेरिका सर्वप्रथम चंद्रावर पोहचला तेव्हा सर्वच देशांनी या स्पेस रेस मध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, रशिया या सारख्या देशांनी यशस्वीरित्या चंद्रावर यान पाठवले. तेव्हा बाकीच्या देशांना वाटले की अमेरिका आणि रशिया सारख्या महासत्ता काही दिवसांनी चंद्रावर आपला दावा ठोकतील आणि चंद्र ही आपलीच प्रॉपर्टि आहे असे सांगतील. म्हणून मग 104 देश मिळून 1979 साली UN (United Nation) मध्ये एक करार झाला, आणि या करारात ठरविण्यात आले की चंद्र, किंवा इतर ग्रह तारे तसेच इतर खगोलीय गोष्टी ह्या कोणत्याच देशाच्या मालकीच्या नाहीत आणि कोणताच देश यावर आपला हक्क सांगू शकत नाही.
चंद्रयान 3 च्या यशानंतर बर्याच लोकांना चंद्राबद्दल उत्सुकता वाटू लागली आहे. आणि लोक इंटरनेट वर How to Buy Land on Moon सारख्या Queries सर्च करत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की चंद्र, तारे आणि इतर खगोलीय वस्तु ह्या कोणाच्याच मालकीच्या नाहीत. आणि यांना कोणीच विकत घेऊ किंवा विकू शकत नाही.
परंतु काही अश्या कंपन्या आहेत ज्या मानतात की 1979 साली झालेल्या InterMoon Treaty (चंद्र करार) मध्ये असे ठरविले होते को कोणताच देश चंद्रा सारख्या इतर खगोलीय वस्तूंवर आपला दावा ठोकू शकत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की करारामद्धे देश हा शब्द वापरला होता येथे नागरिक असा शब्द दिसत नाही म्हणून नागरिकांना चंद्रावर जमीन विकत घेण्याचा हक्क आहे.
Media Report नुसार लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री या कंपन्या आहेत ज्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात. या कंपन्यांच्या माध्यमातूनच 2002 मध्ये हैदराबादचे राजीव बागडी आणि 2006 मध्ये बेंगळुरूचे ललित मोहता यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली होती. 2017 मध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही चंद्रावर जमीन खरेदी केली होती. शाहरुख खानला ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका चाहत्याने चंद्रावर जमीन खरेदी करून भेट दिली होती.
Moon Land Price
Lunarregistry.com च्या मते, चंद्रावरील एक एकर जमिनीची किंमत USD 37.50 म्हणजेच सुमारे 3,120.96 रुपये आहे. आऊटर स्पेस ट्रीटी 1979 नुसार, अंतराळातील कोणत्याही ग्रहावर किंवा चंद्रावर कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा अधिकार नाही. चंद्रावर कोणत्याही देशाचा ध्वज फडकावला तरी चंद्राचा कोणीही मालक होऊ शकत नाही.
चंद्रचा कोणीच मालक होऊ शकत नाही, मग Lunarregistry सारख्या कंपन्या रजिस्ट्री कशी करत आहेत? अशा स्थितीत चंद्रावरील जमीन विकण्यात किंवा विकत घेण्यात काही अर्थ नाही हे स्पष्ट आहे, परंतु तरीही तो एक मिलियन डॉलरचा व्यवसाय झाला आहे. एकरी 3 हजार रुपये लोकांना स्वस्त वाटतात म्हणून लोक या गोष्टीकडे जास्त आकर्षित होत आहेत. चंद्रावर जमीन विकत घेऊन आपण कधी चंद्रावर जाऊन तिथे राहू शकत नाही कारण तिथे आपल्या पृथ्वी सारखे वातावरण नाही. म्हणून How to buy Land on moon सारख्या गोष्टींना काहीच अर्थ नाही.
महत्वाच्या लिंक्स
मित्रांनो, पोस्ट आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी Krushi yojana ला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा.