सावित्रीबाई फुले माहिती | सावित्रीबाई फुले कार्य | सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Information in Marathi | Savitribai Phule Biography | Savitribai Phule Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्राच्या जननी म्हणून ओळख असलेल्या सावित्री बाई ज्योतिबा फुले यांच्या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जसे की सावित्री बाई फुले यांचा जन्म, सावित्री बाई फुले यांचे शिक्षण, सावित्री बाई फुले यांचे समाजकार्य, सावित्री बाई फुले यांच्या वर निबंध कसा लिहायचा या साठी या लेख शेवट पर्यन्त वाचवा अशी विनंती आहे.
{tocify} $title={Table of Contents}
सावित्रीबाई फुले यांचा जन्म
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला.
🔥 नाव |
सावित्रीबाई फुले |
🔥 पति |
ज्योतीराव गोविंदराव फुले |
🔥 जन्म |
3 जानेवारी 1831 |
🔥 मृत्यू |
10 मार्च 1897 |
🔥 विभाग |
कौटुंबिक पार्श्वभूमी
सावित्रीबाई फुले यांच्या वडलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील होते. 1840 मध्ये सावित्रीबाई चा विवाह ज्योतिराव फुले यांच्या सोबत झाला (वयाच्या नवव्या वर्षी). ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली. स्त्री शिक्षणाची प्रेरणा त्यांनी त्यांच्या भगिनी सगुणाबाई क्षीरसागर यांच्या कडून घेतली. अहमदनगर येथे फरार बाईंच्या व पुण्यात मिचेल बाईंच्या नॉर्मल स्कूल मध्ये त्यांनी अध्यापणाचे शिक्षण घेतले.
हे पण वाचा :-
१) कर्मवीर भाऊराव पाटील
२) महादेव गोविंद रानडे
३) गोपाळ हरी देशमुख
४) दादोबा पांडुरंग तरखडकर
५) नाना शंकरशेठ {alertInfo}
सावित्रीबाई फुले यांचे कार्य
1 जानेवारी 1848 रोजी फुले दांपत्यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, तिथेच सावित्रीबाई शिकवू लागल्या. गोविंदराव फुले यांचा सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाला विरोध होता त्यामुळे त्यांनी दोघांनाही म्हणजे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना बाहेर काढले. सना-तण्यांचा विरोध होत असतांना सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षणाचे आणि समाज कार्य सुरूच ठेवले. सावित्रीबाईच्या कार्यावर प्रभावित होऊन मेजर क्यंडी साहेबांनी त्यांची प्रशंसा केली. या कामात सावित्रीबाई फुले यांना मुस्लिम समजाच्या फातिमा बेग यांचे सुद्धा सहकार्य लाभले. सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी अनेक वेळा ज्योतिराव फुले यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांनी ते ऐकले नाही ते म्हणत होते की ‘स्त्री ला दुसरे लग्न करण्याचा अधिकार नाही मग पुरूषांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार कसा?‘ म्हणून त्यांनी त्यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या ब्राम्हण महिलेच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्या मुलाचे नाव यशवंत असे ठेवले.
- विधवेच्या केशवपणाच्या विरुद्ध नाभीकांचा संप सावित्रीबाई ची प्रेरणा घेऊन दिनकर चे संपादक ना.म.लोखंडे यांनी घडवून आणला.
- फुलेनी शिवाप्पाच्या मदतीने धनकवडी येथे उभारलेल्या विक्टोरिया बालिकाश्रमात सावित्री बाई स्वत: स्वयंपाक करत होत्या.
- सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजातर्फे 52 अन्न छत्रालये चालवली.
- सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबांकर यांची कन्या राधा व सीताराम जबाजी आल्हाट यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने घडवून आणला.
- सत्यशोधक समाजाने पूरोहित नाकारून अत्यंत साध्या पद्धतीने, हुंड्याशिवाय कमी खर्चात विवाह लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
वाङ्मय
- सावित्रीबाईंचा पहिला काव्य संग्रह “काव्यफुले” हा 1850 ला प्रसिद्ध झाला.
- सावित्रीबाईंच्या बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह अमरावतीतील कारजगाव येथील सत्यशोधक कार्यकर्ते स्वामी लक्षमनशास्त्री सोनार यांच्या कडे 7 नोव्हेंबर 1892 ला प्रसिद्ध केला.
- ज्योतीबांची भाषणे 1 ते 4
- मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे व विचार 1891 आणि गाणी.
- इत्यादि लेखन सावित्रीबाई फुले यांनी केले.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारच्या नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा. {alertSuccess}