गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म हा 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुण्यात झाला. गोपाळ हरी देशमुख यांचे मूल घराने हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील होते. Gopal Hari Deshmukh Biography in Marathi
Lokhitwadi |
गोपाळ हरी देशमुख यांच्या वडिलांचे नाव हरिपंत होते ते दुसर्या बाजीराव चे सेनापति बापू गोखले यांचे फडणीस होते, त्यांच्या आई चे नाव कशिबई होते. त्यांच्या घराण्याकडे 12 गावांची देशमुखी होती. गोपाळ हरी देशमुख यांचे मूळ आडनाव हे सिद्धये होते. पेशव्यांचे राज्य जिंकल्यानंतर ते एल्फिस्टन ला भेटावयास न गेल्याने त्यांची जहंगिरी जप्त करण्यात आली. 1829 मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची मुंज झाली व 1830 साली वयाच्या 7 व्या वर्षी त्यांच्या विवाह झाला.
{tocify} $title={Table of Contents}
गोपाळ हरी देशमुख यांचा परिचय
संपूर्ण नाव | गोपाळ हरी देशमुख |
वडिलांचे नाव | हरिपंत देशमुख |
आईचे नाव | काशीबाई |
जन्म | 18 फेब्रुवारी 1823 |
मृत्यू | 9 ऑक्टोबर 1892 |
टोपण नाव | लोकहितवादी |
विभाग | मराठी बायोग्राफी |
शिक्षण आणि नोकरी
- 1844 साली दक्षिणेतील सरदारांच्या एजेंटच्या ऑफिसात दरमहा 70 रुपये पगारची ट्रान्सलेटर ची नोकरी केली.
- 1846 मध्ये ते मुंसिफ ची परीक्षा पास झाले.
- 1851 मध्ये ते वाई येथे न्यायाधीश झाले.
- 1856 ला त्यांची नेमणूक सहाय्यक इनक कमिशनर म्हणून झाली. 1857 ते 1861 या काळात ते कमिशनर पदी होते.
- सप्टेंबर 1862 मध्ये ते सहाय्यक न्यायाधीश (मुंबई सरकार खात्यात) बनले व 1879 मध्ये त्याच पदावरून निवृत्त झाले.
- 1867 साली अहमदाबाद येथे स्मॉल कोज कोर्टात जज्ज म्हणून कामास सुरुवात केली. 1878 मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
- ब्रिटिश सरकार ने त्यांना लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात 1877 ला रावबहादुर ही पदवी दिली.
गोपाळ हरी देशमुख यांचे वाङ्मय
1848 ते 1892 या काळात गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी विविध विषयावर लेखन केले, त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती मराठीत 36 ग्रंथ लिहिले.
ऐतिहासिक लेखन
– भारतखंड पर्व 1851 हिंदुस्थांनचा संक्षिप्त इतिहास
– पानीपत ची लढाई (काशीराज पंडित यांच्या फारसी ग्रंथाच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद)
– हिंदुस्तान चा इतिहास – पूर्वार्ध 1842
– पुष्पयन 1851
-गुजरात देशाचा इतिहास (पुणे 1885)
-लंकेचा इतिहास (पुणे 1888)
इत्यादि वेगवेगळे ऐतिहासिक ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिले.
तसेच लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून 1848 मध्ये शतपत्रे लिहिण्यास सुरुवात केली, त्यातून त्यांनी ऐतिहासिक – धार्मिक – राजकीय व सामाजिक माहिती दिली.
सामाजिक विचार
नोकरी निमित्त लोकहितवादी जेथे गेले तेथे त्यांनी नीरनिराळ्या संस्था स्थापून सामाजिक कार्य केले. गरजूनसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना काढला. वाई येथे न्यायाधीश असतांना कृष्णा नदीला पुर आल्यानंतर पूरग्रस्तांना आर्थिक मदत केली. त्यांचे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या प्रार्थना समाजाशी जवळचे संबंध होते. आणि ते काही काळ आर्य समाजाचे अध्यक्ष सुद्धा होते.
लोकहितवादी यांचा मृत्यू हा दिनांक 9 ऑक्टोबर 1892 रोजी झाला.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न
प्रश्न – गोपाळ हरी देशमुख यांचे टोपणनाव काय होते?
– लोकहितवादी
Question – Gopal Hari Deshmukh is Popularly Known As?
– Lokhitwadi
प्रश्न – लोकहितवादी यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
– गोपाळ हरी देशमुख यांनी लहानमोठे सुमारे 39 ग्रंथाचे लेखन केले.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा.