महाराष्ट्रातील सर्वांनाच परिचित असलेले परभणीचे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक १५ ते २५ जुन २०२१ चा हवामान अंदाज (Weather Report Maharashtra) आपण पाहणार आहोत.
Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra |
-15 ते 22 जून दरम्याण राज्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाउस पडेल व पेरणी होइल
हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!
हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज – दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}
पेरणी करण्यासाठी स्वःत जमिनीतील ओल पाहूण निर्णय घ्यावा
- पूर्व-विदर्भ
- प-विदर्भ
- मराठवाडा
- दक्षिण महाराष्ट्र
- कोकन पट्टी
- प-महाराष्ट्र
वरील विभागातील पेरणी होइल . जिल्हातील एखाद्याच भाग भाग सुटेल. उत्तर महाराष्ट्रात पेरणी ला वाट पहावी लागेल . 2009 ला मान्सून पूर्वेकडून आला होता . उत्तर महाराष्ट्राची पेरणी उशीरा झाली पण असे झाले तर उर्वरीत विभागात खूप मुसळधार पाउस पडेल.
हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}
नोट :- 1 फुट ओल गेली तरच पेरणी करावी. या पावसावर काही भागातील बळीराजाची पेरणी होइल. उत्तर महाराष्ट्राला पेरणी साठी थोडी वाट पहावी लागेल.
.
माहितीस्तव – राज्यात मान्सून शॉर्ट कट पूर्वे कडून आल्यामुळे विदर्भ मराठवाडा या भागातील पेरणी सुरवातीला होइल . उत्त्तर महाराष्ट्राला पेरणी साठी विलंब होइल.
नोट :- वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे. तसेच दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे. आणि शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचवा ही विनंती.
लेखक :- पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक :- 15/06/2021