शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पैसे गुंतविण्याचा विचार करीत असाल तर पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patr Yojana) तुमच्या साठी फायदेशीर ठरू शकते. ज्या मध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देखील मिळू शकतो. काय आहे किसान विकास पत्र योजना ( What is Kisan Vikas Patr Yojana) या बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Kisan Vikas Patr Yojana |
ठराविक काळानंतर मिळेल मोठी रक्कम
किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक वेळ गुंतवणूक योजना आहे, ज्यामधे एका निश्चित कालावधीत आपले पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patr Yojana) ही योजना देशातील सर्व टपाल कार्यालये म्हणजे पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपस्थित आहे. याचा परिपक्वता कालावधी सध्या 124 महिने आहे. यामध्ये कमीत कमी गुंतवणूक तुमची १००० रुपये करू शकता आणि कोणतीही गुंतवणूक मर्यादा नाही. आणि विशेष म्हणजे केंद्र सरकार ने ही योजना शेतकर्यांची बचत व्हावी या उद्देशाने सुरू केली आहे.
गुंतवणूक कोण करू शकते?
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patr Yojana) मध्ये गुंतवणूक करणार्या व्यक्तीचे कमीत कमी वय 18 वर्षे असावे.एका खात्याव्यतिरिक्त, संयुक्त खात्याची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्याची देखभाल पालक करू शकतात. किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patr Yojana) गुंतवणूकीसाठी 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे आहेत, ती खरेदी करता येतील.
आवश्यक कागदपत्रे
किसान विकास पत्र योजने मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या जवळ खालील कागदपत्रे असावी
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- किसान विकास पत्र अर्ज (Kisan Vikas Patr Application)
- पत्याचा पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
किसान विकास पत्र योजना एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील हस्तांतरित केले जाऊ शकते (Kisan Vikas Patr Yojana Transfer). किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे वर्ग केला जाऊ शकतो.केव्हीपीमध्ये नामनिर्देशन सुविधा उपलब्धआहे. किसान विकास पत्र पासबुकच्या रूपात जारी केला जातो.
अश्या प्रकारे तुम्ही किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला या योजने बद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट देऊ शकता किंवा आम्हाला मेल देखील करू शकता.