Cidco: Naina Housing Lottery 2023 Online Registration Form

CIDCO Lottery Registration Form 2023 | Apply Online for CIDCO Housing Scheme | lottery.cidcoindia.com registration / login | New Naina housing lottery application | Start / Last Date for CIDCO Lottery 2023 | Inclusive Housing Lottery 2023 application: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी lottery.cidcoindia.com वर ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत.

या Cidco Housing Lottery 2023 अंतर्गत, तुम्ही नैना प्रदेश, नवी मुंबईतील 181 घरांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यात अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 164 सदनिका आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 17 सदनिका समाविष्ट आहेत.

सिडको लॉटरीने लहान व्यापारी आणि व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी मिळवून दिली आहे. या लेखात, आम्‍ही तुम्‍हाला Cidco Naina Lottery 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे की ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे, शेवटची तारीख इत्यादि सांगणार आहोत, विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Cidco Naina Lottery 2023 Online Apply

नैना गृहनिर्माण योजनेसाठी Cidco Lottery Registration 2023 करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे:-

  • या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल – https://lottery.cidcoindia.com/App/

सिडको लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी 3 भाग आहेत –

  1. अधिकृत पोर्टल वर संपूर्ण महत्वाची माहिती भरून नोंदणी करणे
  2. लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करणे आणि योजनेसाठी पोचपावती प्रिंट करणे,
  3. अर्ज करून झाल्यावर ऑनलाइन पेमेंट करणे.
  • नोंदणी करण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत पोर्टल वर तुम्हाला जावे लागेल आणि मुखपृष्ठावर “Register For Lottery” या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर खालील प्रकारे Registration Form तुमच्यासमोर उघडेल.
  • Login ID आणि Password तयार करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती बरोबर भरावी लागेल.
  • Login ID आणि Passward तयार केल्यानंतर तुम्हाला Cidco Housing Lottery 2023 साठी अर्ज करावा लागेल आणि नंतर पेमेंट करावे लागेल.

CIDCO NAINA Housing Scheme 2023 Important Dates

  • Registration – 21 September 2023 to 18 October 2023.
  • Edit Registration – 21 September 2023 to 18 October 2023.
  • Application –  29 September 2023 to 18 October 2023.
  • Online Payment – 29 September 2023 to 19 October 2023.
  • RTGS NEFT Challan Generation – 29 September 2023 to 19 October 2023.
  • RTGS NEFT Payment – 29 September 2023 to 19 October 2023.
  • Draft list of Accepted Applications – 2 November 2023.
  • List of Accepted Applications – 4 November 2023.
  • Draw – 8 November 2023.
  • List of Winners – 8 November 2023.
  • Refund – 13 November 2023.

Naina CIDCO Housing Lottery Advertisement 2023

आगामी सिडको लॉटरी 2023 मध्ये, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रदेशात घरे दिली जातील. सिडको लॉटरी गृहनिर्माण योजनेची जाहिरात खाली दर्शविली आहे:-

सिडको नैना गृहनिर्माण लॉटरी महत्वाची माहिती

सिडको द्वारा एकूण 181 सदनिकांची गृहनिर्माण योजना सुरू करण्यात येत आहे. यापैकी सतरा सदनिका ईडब्ल्यूएससाठी तर १६४ सदनिका एलआयजीसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा सदनिकांसाठी पात्र उमेदवारांची लॉटरी काढून निवड करण्याची सुविधा सिडको देत आहे. या सोडतीनंतर पात्र उमेदवारांच्या नावांची यादी सिडकोकडून संबंधित विकासकांना कळवली जाईल.

ही Naina Housing Scheme समाजातील सर्व घटकांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे शहराचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल आणि नवी मुंबईची व्यावसायिक क्षमता वाढवून आर्थिक विकासालाही हातभार लागेल. यामुळे छोटे व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी लवकरात लवकर या योजनांचा लाभ घ्यावा आणि घर आणि व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

सविस्तर माहिती cidco.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. नोंदणीपासून ते संगणकीकृत सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पारदर्शक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केल्या जातील. योजनांच्या तपशीलांबद्दल जाणून घेण्यासाठी अर्जदारांनी वरील वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते. सिडको समावेशी गृहनिर्माण लॉटरीबद्दल अधिक तपशील lottery.cidcoindia.com वर तपासता येतील.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.