सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकजन बेरोजगार झाले आहेत, बऱ्याचशा कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखवला आहे. अशा चिंताग्रस्त आणि दडपण युक्त वातावरणामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करून किंवा त्याबद्दलचे ज्ञान मिळवून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करता येऊ शकते. आजच्या पोस्ट मध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय? हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत? खरच हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे पाण्याविणा शेती करता येवू शकते का? या सर्व प्रश्नांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Hydroponic Farming |
हायड्रोपोनिक्स ही संकल्पना सगळ्यांना परिचयाची आहे. नेमके हायड्रोपोनिक्स संकल्पना व तंत्रज्ञान काय असते किंवा त्याचा उपयोग कश्या पद्धतीने करावा हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये.
हेही वाचा – फळबाग लागवड अनुदान
हायड्रोपोनिक्स तंत्र काय आहे?
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अंगण किंवा घराचे छत म्हणजेच गच्ची किंवा माळी असणे गरजेचे असते. गच्चीवर केलेल्या शेतीला टेरेस फार्मिंग असेही म्हणतात. सध्या टेरेस फार्मिंग खूप ट्रेंड मध्ये असून यात आपण रोख पैसे कमवू शकता. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येणारी शेती ही माती विना केली जाते. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकतत्वे पाण्याच्या साहाय्याने दिले जातात. यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात. तंत्रज्ञानामध्ये पिकांच्या वाढीसाठी मुख्यतः पाण्याची आवश्यकता असते. परंतु पिकांना आधार यासाठी माती संख्या भोवती घटकांची आवश्यकता असते.
वनस्पतींची ही गरज पर लाईट कोकोपीट किंवा वाळू सारख्या उदासीन माध्यमांद्वारे पूर्ण केली जाते. व यांच्या साहाय्याने पिकांची वाढ पूर्ण केली जाते. हायड्रोपोनिक्स मध्ये वनस्पती आंनद्राव्यांनी परिपूर्ण असलेल्या द्रावणामध्ये नैसर्गिक रित्या वाढतात. हरितगृह सारख्या संरक्षित शेतीमध्ये भरपूर प्रकाश, नियंत्रित तापमान सहा याचा वापर केला जातो. भारतामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राचा प्रथम वापर 1946 मध्ये इंग्रज शास्त्रज्ञ डब्ल्यू. जे. शाल्तो डग्लस यांनी केला होता. हे तंत्र आता आधुनिक शेती पद्धतीचा एक भाग बनून राहिले आहे.
हेही वाचा – Sharad Pawar Gramin Samriddhi Yojana
हायड्रोपोनिक्स तंत्राने कोणती पिके घेतली जातात?
हायड्रोपोनिक्स तंत्राच्या पद्धती कोणत्या आहेत?
हेही वाचा – Cow Dung Paint (शेणापासून रंग बनवण्याचा व्यवसाय)
हायड्रोपोनिक्स तंत्राचे फायदे काय आहेत?
- या तंत्रामध्ये जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता च नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
- जागेचा कार्यक्षम वापर करता येतो.
- हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानासाठी वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे पिकांच्या वेगवान वाढीसाठी आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.
- जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ दहा टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्य ही पद्धत उपयुक्त ठरते.
- पाण्यामध्ये पोषक खनिजे कृत्रिमरित्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. त्याचा परिणाम असा होतो की पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये 50 टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
- हायड्रोपोनिक्स मध्ये तने, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो मशागत, आंतर मशागत, सिंचन, खुरपणी अशी कामे करावी लागत नाही.
- परिणामी वेळेची आणि मजुरांची बचत होते. कमीत कमी जागेत होते जागेमध्ये नियंत्रित पद्धती व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते.