या जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार | Pik Vima 2021

 

गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

पिक विमा 2021
पिक विमा 2021
गतवर्षी खरीप हंगामामध्ये पिकाचा विमा उतरविणाऱ्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मदतीस पात्र शेतकरी सोयाबीन उत्पादक असून कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तूर उत्पादकांनाही पीक विम्याची मदत मिळणार आहे. विमा कंपनीने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा उतरविणारे चार लाख शेतकरी या पीक विम्याला मुकले आहे.

 यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी तीन लाख ३६ हजार ५४९ हेक्टरसाठी विमा सुरक्षाकवच उभारले होते. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५ कोटी रुपये विमा कंपनीकडे वळते केले होते. गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले. पात्र असलेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये विम्याची ही रक्कम भिन्न आहे. याशिवाय, पात्र शेतकऱ्यांची संख्याही विभागण्यात आली आहे. हे सुद्धा चेक करा – मेरी फसल मेरा ब्यौरा पंजीकरण

कुठल्या शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळाली, याची माहिती कृषी विभागालाही सध्या उपलब्ध नाही. मिळालेली संपूर्ण रक्कम विमा कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली आहे. काही बँकांनी मदतवाटपाला सुरुवातही केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिके मदतीला पात्र ठरली आहे. जिल्ह्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या मदतीला पात्र ठरली आहे. 

एक लाख ९७ हजार ५१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यातील २५ हजार ४०४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे. तर, एक लाख सात हजार ६६ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरविला होता. यातील दहा हजार ६८४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना १२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या ४३ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. यातील दहा हजार ५९ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना तीन कोटी ९२ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. उडिदाचे उत्पादन घेणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यातील ३२२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांना सहा लाख ७९ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. 

मुगाची लागवड करणाऱ्या २६ हजार ९१७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील १४५३ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना २८ लाख ४४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तुरीची लागवड करणाऱ्या ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यामध्ये १३ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना सहा कोटी ६३ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. इतर शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागले आहे.

असे आहेत मदतीला पात्र ठरलेले तालुक्यातील शेतकरी

आर्णी तालुक्यात ९२५ शेतकऱ्यांना ५१ लाख १५ हजार ९१५ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. बाभूळगाव चार हजार १२५ शेतकरी, चार कोटी ५९ लाख. दारव्हा एक हजार ९० शेतकरी ८६ लाख २३ हजार. दिग्रस १६९३ शेतकरी, १ कोटी २३ लाख. घाटंजी १६ हजार २१५ शेतकरी, १६ कोटी ६८ लाख. कळंब तीन हजार ९३ शेतकरी, एक कोटी २८ लाख. केळापूर सात हजार ४३२ शेतकरी, सात कोटी ४६ लाख. महागाव चार हजार ६९० शेतकरी, एक कोटी ५६ लाख. मारेगाव दोन हजार ४५४ शेतकरी, ८३ लाख. नेर ५०३ शेतकरी, ४६ लाख ९२ हजार. पुसद दोन हजार ९३ शेतकरी, एक कोटी ८७ लाख. राळेगाव दोन हजार २८१ शेतकरी, एक कोटी ४७ लाख. उमरखेड सात हजार ६६३ शेतकरी, चार कोटी आठ लाख. वणी १५६८ शेतकरी, ६७ लाख. यवतमाळ चार हजार १०० शेतकरी, दोन कोटी ८७ लाख. झरी जामणी १३६४ शेतकरी, ६९ लाख.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.