रेशन कार्डद्वारे सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देते. तसंच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आयडी प्रुफ म्हणूनही रेशन कार्डचा वापर केला जातो. How To Add Name In Ration Card | Ration Card Madhe Nav Kase Jodayche | Ration Card Add New Name | Ration Card New Name | How To Add Child Name In Ration Card | How To Add Wife Name In Ration Card
रेशन कार्डद्वारे सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देते. रेशन कार्ड असेल तरच स्वस्त दरातील धान्य मिळू शकतं. रेशन कार्डचा वापर एलपीजी गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स अशा अनेक ठिकाणी आयडी प्रुफ म्हणूनही केला जातो. रेशन कार्ड हे एका ठराविक उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी असतं, ज्याच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सीमा असतात. रेशन कार्डमध्ये नव्या सदस्यांचंही नाव जोडता येण्याची सुविधा आहे.
येथे द्यावी लागेल माहिती
रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचं नाव जोडण्यासाठी, व्यक्तीच्या आधार कार्डमध्ये बदल करावे लागतील. उदा. एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल आणि तिने आडनाव बदललं असेल, तर त्या मुलीला आधार कार्डमध्ये आपल्या वडिलांच्या जागी पतीचं नाव टाकावं लागेल. तसंच राहण्याचा नवा पत्ताही अपडेट करावा लागेल. त्यानंतर नवीन आधार कार्डचे डिटेल्स मुलीच्या सासरच्या भागात असणाऱ्या खाद्य विभाग अधिकाऱ्याला द्यावी लागेल.
मुलीचं नाव आधीच्या रेशन कार्डमधून हटवून, नव्या रेशन कार्डमध्ये सामिल करण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर्ड असावा लागेल. त्यासाठी खाद्य विभागाच्या अधिकृत साईटवर जावं लागेल.
या डॉक्यूमेंट्सची गरज
– लहान मुलाचं नाव जोडण्यासाठी कुटुंब प्रमुखाचं रेशन कार्ड, मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र आणि मुलाच्या आई-वडिलांच्या आधार कार्डची गरज लागेल.
– तसंच नवीन सुनेचं नाव रेशन कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी, आई-वडिलांच्या घरी असणाऱ्या रेशन कार्डमधून नाव हटवल्याचं प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट, पतीचं रेशन कार्ड आणि त्या महिलेचं आधार कार्ड द्यावं लागेल.