आंतरजातीय विवाह योजना | Intercaste Marriage Scheme Maharashtra | Aantarjatia Vivah Yojana | Marriage Scheme Maharashtra | आंतरजातीय विवाह योजना | Antarjatia Vivah Yojana Maharashtra
आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्य सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीय भेदभाव दूर करण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, पहिला आंतरजातीय विवाह करणार्या लाभार्थी जोडप्यांना रु. 50000 ची प्रोत्साहनपर रक्कम दिली जात होती, ती वाढवून या वर्षी म्हणजे 2023 पासून राज्य सरकारने ती रक्कम वाढवून 3 लाख रुपये केली आहे. Inter-Caste Marriage Scheme Maharashtra योजनेंतर्गत,राज्यातील जे जोडपे आंतरजातीय विवाह करणार आहेत त्यांना यापुढे 3 लाख रुपये प्रोत्साहन पर रक्कम म्हणून मिळणार आहेत. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Aantarjatia Vivah Yojana Maharashtra बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
आंतरजातीय विवाह योजना 2023
महाराष्ट्र राज्यातील एखाद्या सामान्य प्रवर्गातील मुलाने किंवा मुलीने अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी विवाह केल्यास, त्यांना आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत राज्य सरकारकडून लाभ दिला जाईल. केवळ महाराष्ट्रातील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा, 1955 किंवा विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना 2023 अंतर्गत, लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारी रक्कम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे सुपूर्द केल्या जाईल. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकार 50-50% देईल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.
आंतरजातीय विवाह योजना 2023 चा उद्देश
तुम्हाला माहिती आहेच की, आपल्या देशात जातीबाबत खूप भेदभाव केला जातो. मात्र हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवित असते. यापैकी एक योजना आंतरजातीय विवाह योजना (Inter-Caste Marriage Scheme) आहे, या योजनेंतर्गत, राज्य सरकार 3 लाख रुपये पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करेल.आंतरजातीय विवाह योजना 2023 (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme) द्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी केला जात आहे. या योजनेमुळे समाजात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन तर मिळेलच, पण पात्र जोडप्यांना प्रोत्साहनपर 3 लाख रुपये रक्कमही दिली जाईल.
Inter-Caste Marriage Scheme Maharashtra
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाह योजना |
कोणी सुरू केली | राज्य सरकार |
मिळणारी रक्कम | 3 लाख रुपये |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व पात्र नागरिक |
वर्ष | 2023 |
आंतरजातीय विवाह योजना 2023 ची विशेषता
- या योजनेत राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशनतर्फे २.५० लाख रुपये, अशी एकूण ३ लाख रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
- आंतरजातीय विवाह योजना 2023 (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme) द्वारे जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मांमध्ये समानता आणणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
- ही रक्कम विशेषत: ज्या तरुण-तरुणींनी आंतरजातीय विवाह केला आहे त्यांना दिली जाईल.
- Maharashtra Inter-Caste Marriage Scheme अंतर्गत लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे लाभार्थ्याचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
- या योजनेंतर्गत वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेता येईल.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- आंतरजातीय विवाह योजनेत मिळणारी रक्कम मिळविण्यासाठी पुरुष आणि महिलेचे वय अनुक्रमे 21 व 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
- विवाहित जोडप्यांपैकी कोणतेही एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असावा.
- केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी प्रोत्साहन रक्कम मिळविण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
- आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य वर्गातील मुला किंवा मुलीशी विवाह केल्यास, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
Intercaste Marriage Scheme Maharashtra आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- बँक पासबूक
- जातीचे प्रमाणपत्र
- वयाचा दाखला
- Court Marriage Certificate
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Intercaste Marriage Scheme Online Application
- आंतरजातीय विवाह योजना 2023 (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme)साठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल मुखपृष्ठावरच तुम्हाला Antarjatia Vivah Yojana 2023 साठी ऑनलाइन अर्जाचा पर्याय दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पृष्ठावर तुमच्यासमोर Inter-Caste Marriage Scheme चा अर्ज उघडेल, अर्जामद्धे विचारलेली संपूर्ण माहिती भरून तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
- वरील प्रकारे तुम्ही आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 (Maharashtra Inter-Caste Marriage Scheme) साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. इंस्टाग्राम फोटो डाऊनलोड करा – Downloadgram.