सौर कृषी पंप मिळवण्यासाठी असा अर्ज करा – PM KUSUM SOLAR PAMP YOJANA MAHARASHTRA

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना सौर कृषी पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय उर्जा संयत्र शेतात स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री किसान उर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच PM KUSUM योजना सुरु केली आहे. PM KUSUM SOLAR PAMP YOJANA MAHARASHTRA

PM KUSUM SOLAR PAMP YOJANA MAHARASHTRA



प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमेतेचे सौर पंप शेतकर्‍यांना देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 1 लाख सौर कृषी पंप स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. PM KUSUM SOLAR PAMP YOJANA MAHARASHTRA

पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं केंद्र सरकारच उद्दीष्ठ आहे.

  • महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या https://mahadiscom.in/solar-pmkusum/index_mr.html या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल.
  • यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, ७/१२, पाण्याचा स्त्रोत असल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते किंवा पासबूक झेरॉक्स लागणार आहे.
  • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याजवळून 10 टक्के रक्कम खर्च करावी लागेल.
  • एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के रक्कम खर्च करणं आवश्यक आहे.
  • जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र शेतकर्‍यांजवळ असणे आवश्यक आहे.
प्रधामनंतरी कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री श्री.अरुण जेटली यांनी केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही आणि ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना अमलात आणली होती. कमी पावसामुळे आणि वीज नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना दिली होती.

प्रधानमंत्री कुसुम योजनेची वैशिष्टे

  1. शेतकर्‍यांना सौर कृषी पंप आपल्या शेतात बसवण्यासाठी १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
  2. केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सबसीडी ची उर्वरित रक्कम जमा करेल.
  3. कुसुम योजने अंतर्गत बँक शेतकर्‍यांना ३० टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध करून देणार आहे.
  4. सौर ऊर्जेचा प्लांट पडीत जमिनीवर सुद्धा लावता येईल.

ग्रीड बनवून कंपनीला वीज देऊन सुद्धा होईल फायदा

प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात आणि याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.जलसिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा शेतकर्‍यांना होऊ शकतो.

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.