आनंदाची बातमी !! देशातील 17 राज्यांनी वन नेशन वन रेशन कार्ड योजना आपल्या राज्यात लागू केली आहे. उत्तराखंड राज्याने नुकताच ही योजना आपल्या राज्यात सुरु करणार असल्याचं जाहीर केल.वन नेशन वन रेशन कार्ड one nation one ration card scheme in marathi योजनेमुळे आता देशातील कोणताही रेशन कार्ड धारक कोणत्याही राज्यातून आपल्या रेशनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा फायदा हा मुख्य करून स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबाला होणार आहे. त्यांना देशाच्या कुठल्याही भागात रेशन धान्य दुकानातून धान्य घेता येण या योजनेमुळे शक्य होणार आहे.one nation one ration card scheme in marathi
अर्थ मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात सांगितलं आहे की या 17 राज्यांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी 37,600 कोटी रुपये अतिरिक्त उधारीवर देण्यात येणार आहेत.
वन नेशन वन रेशन कार्ड सारांश
योजनेचे नाव |
वन नेशन वन रेशन कार्ड |
कोणी सुरू केली |
श्री रामविलास पासवाण |
उद्देश |
संपूर्ण देशासाठी एकच रेशन कार्ड |
योजनेचा कालावधी |
जून २०३० |
लाभार्थी |
देशातील सर्वच रेशन कार्ड धारक |
नोडल एजन्सि |
भारतीय खाद्य निगम |
केंद्र सरकारच्या या अतिरिक्त फंडाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी तयारी सुद्धा या राज्यांनी सुरू केली आहे. या योजनेत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग हा नोडल एजन्सी म्हणून कार्य करणार आहे.
हेही पहा – रेशन कार्ड लिस्ट २०२१ – अश्या प्रकारे पहा आपले रेशन कार्ड ऑनलाइन
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीवर आणि श्रम संहितां लागू करण्यावर भर प्रामुख्याने देण्यात आला आहे. स्थलांतरित कामगारांची किंवा मजुरांची माहिती संकलित करून त्यांना योग्य ठरेल असे काम उपलब्ध व्हावे, यासाठी पोर्टल सुरू करण्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
देशभर सुधारणा करण्याचे लक्ष one nation one ration card scheme in marathi
देशभरात या योजने अंतर्गत लाभार्थी कोणत्याही ठिकाणी असो त्याला अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून रेशन धान्य उपलब्ध करता यावं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसंच यामाध्यमातून बोगस रेशन कार्डधारकांना या योजनेतून हद्दपार केल्या जाईल. तसेच रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यात येईल आणि प्रत्येक लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळख दिली जाईल. एक देश एक रेशन कार्ड या योजनेला संपूर्ण देशभर लागू करण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सध्या कोणत्या राज्यात वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू आहे. one nation one ration card scheme in marathi
- आंध्र प्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- बिहार
- चंडीगढ़
- दमन एंड दिउ
- गोवा
- गुजरात
- हरियाणा
- हिमाचल प्रदेश
- जम्मू एंड कश्मीर
- झारखंड
- कर्नाटका
- केरला
- लक्षदीप
- लेह लद्दाख
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- मणिपुर
- मिजोरम
- नागालैंड
- उड़ीसा
- पुडुचेरी
- पंजाब
- राजस्थान
- सिक्किम
- तमिल नाडु
- तेलंगाना
- त्रिपुरा
- उत्तर प्रदेश
- उत्तराखंड