MAHADBT किंवा AAPLE SARKAR DBT हा महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्वाचा उपक्रम असून या द्वारे शेतकर्यांना वेग-वेगळ्या शासकीय योजनांसाठी सरकार कडून अनुदान मिळत असते.
AAPLE SARKAR DBT पोर्टल वरुण शेतकर्यांसाठी वेगवेगळ्या सरकारी योजना दरवर्षी राबविल्या जातात यावर्षी सुद्धा AAPLE SARKAR DBT द्वारे शेतकर्यांकडून ट्रॅक्टर, कांदाचाळ, ठिबक सिंचन, शेती अवजारे इत्यादि योजनांसाठी अर्ज भरून घेतले जात आहेत.
AAPLE SARKAR DBT पोर्टल ची वैशिष्टे काय आहेत?
- शेतकर्यांसाठी नोंदणीची पद्धत अगदी सोपी आहे
- शेतकरी केव्हा ही आणि कुठूनही AAPLE SARKAR DBT पोर्टल वर नोंदणी करून शासकीय योजनांसाठी अर्ज करू शकतात
- शेतकर्यांनी केलेल्या अर्जाची स्थिति तपासू शकतात.
- सुलभ पळताळणी साठी 7/12 , 8अ, आणि बँक पासबूक ची झेरॉक्स पोर्टल वर अपलोड करू शकतात
- आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल वरुण अलर्ट मिळतो
- नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभाचे वितरण केल्या जाते, मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अतिशय सुलभ आहे, भूमिका आधारित युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड शेतकर्यांना मिळतो.
शेतकऱ्यांसाठी AAPLE SARKAR DBT वर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. आणि आता आधार नोंदणी न झालेले शेतकरीसुद्धा AAPLE SARKAR DBT पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
उर्वरित माहिती उपलब्ध झाल्यानंतर ते आम्ही येथे पोस्ट करू.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.