नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच म्हणजे दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रचा अर्थसंकल्प २०२१ हा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थ मंत्री श्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत सादर केला. हा महाविकास आघाडीच्या काळातील दूसरा अर्थसंकल्प आहे. अजित दादा पवार यांनी कोरोंना सारख्या अडचणीच्या काळात शेती क्षेत्र सवारल्याच सभागृहात सांगितलं. चला तर पाहू शेतकर्यांच्यासाठी महाविकास आघाडीने काय-काय तरतुदी केल्या आहेत ते पाहू. Maharashtra Agriculture Budget 2021
महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं विधानसभेत सांगितलं. अजित पवार यांनी शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय भाषणात विविध शेतकरी योजनांविषयी माहिती दिली.
हेही वाचा-शेतकर्यांना मिळणार १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत
शेतकऱ्यांसाठी शुन्य टक्के दराने कर्ज
3 लाख रुपये मर्यादे पर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येईल, असं अजित पवार सभागृहात म्हणाले.
बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयांची योजना यावेळी घोषित करण्यात आली आहे.
कृषीपंपाची जोडणी करण्यासाठी महावितरनाला 1500 कोटी
शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी १५०० कोटी रुपये निधी भागभांडवल स्वरुपात देण्यात येईल, असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं. ज्या शेतकर्यांचे वीज बिल थकीत आहेत त्यांना वीज-बिलात 33 टक्के सूट मिळणार आहे, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा जर मार्च २०२२ पर्यंत केला तर राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी शेतकर्यांना देण्यात येईल. 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के म्हणजे 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविणार
विकेल ते पिकेल अभियानासाठी शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी तब्बल 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरु करण्यात येईल. असे पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून संगितले.
प्रत्येक तालुक्यात भाजीपाला रोपवाटिका
प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे राज्यात सुमारे ५०० नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिकेची स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठांना मिळणार ६०० कोटी
महाराष्ट्र राज्यातील ४ कृषी विद्यापीठांच्या संशोधनासाठी येणार्या ३ वर्षात ६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधून देण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान देण्यात येईल.कृषी, पशुसंवर्धन, तसेच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास ३ हजार २७४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
तर शेतकरी मित्रांनो वरील घोषणा महाविकास आघाडीने आपल्या अर्थसंकल्पात केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाविषयी तुमचे काय मत आहे हे तुम्ही खाली कमेन्ट द्वारे कळवू शकता.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.