तेल आणि पेंढीचे भाव वाढल्याने सोयाबीन तेजीत – सोयाबीन चा साठा असलेले शेतकरी फायद्यात

खाद्य तेल आणि DOC चे भाववाढल्यामुळे सोयाबीन चांगले तेजीत आले असून, त्याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाव मिळेल म्हणून सोयाबीन विकले नाही, त्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १४ हजार ४५६ क्विंटलची सोयाबीनची आवक असून, सर्वसाधारण दर ५ हजार २० रुपये, किमान ४ हजार ६५०, तर कमाल ५ हजार ११३ रुपये प्रत्येक क्विंटल ला दर मिळत आहे. हमी भावापेक्षा किती तरी चांगला दर मार्केट यार्ड मध्ये मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्र ही ओस पडलेली दिसत आहेत.

सर्वच शेतकरी मार्केट यार्ड मध्ये सोयाबीनची विक्री करतांना दिसत आहेत. दर चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट पाहालीच नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीनला हा दर मिळत आहे. रब्बी पेरणीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन ची आवक होती. त्यावेळी ४३०० पर्यंतचा दर हा मिळाला होता. आता सोयाबीन ला ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे. पोटलीमध्ये ४ हजार ९६० रुपयेप्रत्येक क्विंटल ला दर मिळत आहे.

हेही वाचा – नवीन विहिरी मंजूर येथे पहा आपली यादी 

बाजारात तेलाचे भाव खूपच आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर हा ११ हजार रुपये क्विंटल होता. सध्या ११ हजार २१० क्विंटलपर्यंत हे दर पोहचले आहेत. त्यामुळे मार्केट मध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी संगत आहेत. पेंढीचाही दर हा चांगला झाला आहे. त्याचाही फायदा सोयाबीनचा दर वाढण्यात होत आहे. यामुळे ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन च स्टॉक करून ठेवला होता किंवा काहींनी विकलेच नव्हते त्यांना ह्याचा चांगलाच फायदा होत आहे.

हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोखल्यास होऊ शकते कारवाई


खाली काही दिनांक 27 फेब्रुवारी रोजीचे सोयाबीन चे बाजार भाव दिलेले आहेत त्यावरुण तुम्हाला अंदाज येईल 


 

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/02/2021
लासलगाव – विंचूर क्विंटल 141 3000 5045 4951
औरंगाबाद क्विंटल 24 4000 4600 4300
माजलगाव क्विंटल 122 4051 5000 4925
परळी-वैजनाथ क्विंटल 1000 4750 5085 4950
तुळजापूर क्विंटल 60 4900 4900 4900
मालेगाव (वाशिम) क्विंटल 400 4200 4800 4600
धुळे हायब्रीड क्विंटल 3 4700 4700 4700
नागपूर लोकल क्विंटल 301 4300 5020 4840
राहूरी लोकल क्विंटल 32 4800 4900 4850
हिंगोली लोकल क्विंटल 805 4500 5100 4800
कोपरगाव लोकल क्विंटल 398 4100 5030 4900
श्रीरामपूर – बेलापूर लोकल क्विंटल 34 4250 4900 4650
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 268 4200 5179 5151
वडूज पांढरा क्विंटल 10 4900 5100 5000
जळकोट पांढरा क्विंटल 407 4300 4700 4500
बारामती पिवळा क्विंटल 114 4501 5050 4991
जालना पिवळा क्विंटल 469 3550 5030 4950
अकोला पिवळा क्विंटल 3689 4300 5100 4900
आर्वी पिवळा क्विंटल 140 3900 4900 4650
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1342 3800 5125 4470
बीड पिवळा क्विंटल 41 4801 4801 4801
उमरेड पिवळा क्विंटल 828 4000 5155 5100
सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 3 4800 5100 5000
भोकर पिवळा क्विंटल 48 3852 4850 4351
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा नग 381 4700 4900 4800
गंगाखेड पिवळा क्विंटल 40 4700 5000 4800
दर्यापूर पिवळा क्विंटल 400 4000 5200 4845
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 650 4600 5069 4900
मुरुम पिवळा क्विंटल 18 3501 4851 4176
नादगाव खांडेश्वर पिवळा क्विंटल 48 4600 4860 4730
उमरखेड पिवळा क्विंटल 320 4200 4400 4300
सिंदी पिवळा क्विंटल 26 4250 4700 4425
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 1150 4400 5105 4850


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा




Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.