नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की अल्पभूधारक शेतकर्यांना अर्थसाहाय्य मिळावे या हेतूने केंद्र सरकार ने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली होती. मात्र या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, काही शेतकरी आयकर भारतात आणि तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेतात हे केंद्र सरकारच्या लक्षत आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे या मध्ये आयकर भरणारे जे शेतकरी आहेत आणि ज्यांनी या योजेनेसाठी रजिस्ट्रेशन केले होते त्यांना मिळालेली रक्कम ही परत करण्याचे आदेश केंद्र सरकार कडून शेतकर्यांना देण्यात आले आहेत.
हे सुद्धा वाचा – PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?
यात दिरंगाई करण्यार्यांवर कायदेशीर कारवाई करून तलाठी कार्यालयातून त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे. यामध्ये ७६१ बोगस शेतकरी आढळून आले त्यांच्या कडून तब्बल ३१ लाख रुपये वसूलण्याचे आदेश सरकारने तहसील कार्यालयाला दिलेआहेत.
तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आयकर भरत असाल आणि प्रधान मंत्री किसान सन्मान निधि योजनेचा लाभ घेत असाल तर ते त्वरित बंद करा. कारण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकर्यांसाठीच सरकार राबवत आहे कृपया त्यांना त्याचा फायदा घेऊ द्या