नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी पीएम किसान सन्मान निधि योजेणे साठि अर्ज कारायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा तहसील कार्यालयामध्ये जावे लागत होते, परंतु नुकताच आलेल्या अपडेट नुसार आपण तो आता डायरेक्ट पीएम किसान सन्मान निधि च्या वेबसाइट वर ऑनलाइन घर बसल्या करू शकतो, आजच्या पोस्ट मध्ये आपण तो अर्ज ऑनलाइन घरी बसून कसा करावा किंवा काही दुरुस्ती जर असेल तर ती कशी करायची हे बघणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधि ऑनलाइन रजिस्ट्रेशन २०२१
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान यांच्या वेबसाइट वर जावे लागेल (येथे क्लिक करा)
- मेनू सेक्शन मध्ये तुम्हाला Former Corner वर क्लिक करायचे आहे.
- खाली दाखवल्या प्रमाणे Former Corner वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तेथे New Farmer Registration असे ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे.
- तुम्ही जर आधी पीएम किसान वर रजिस्ट्रेशन केले असेल तर तसा मेसेज तुम्हाला तेथे दिसेल आणि केले नसेल तर Click Here to Continue बटन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- पुढच्या पेज वर तुम्हाला शेतकर्याचे पूर्ण नाव, त्यांचा पत्ता, सातबार्यावर दिलेला गट नंबर ही माहिती भरायची आहे.
- माहिती पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला Submit या बाटनावर क्लिक करायचे आहे, नंतर तुमची माहिती सेव होईल.
PM तुम्ही पंतप्रधान किसान योजनेसाठी आपला अर्ज सबमिट केला नंतर आणि काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्ड क्रमांकासह तुमच्या अर्जाची स्थितीही तपासू शकता.
आणि तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २००० रुपयाचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात पाठवला जाईल.
किसान सन्मान निधि योजना – स्टेटस चेक
जर तुम्ही यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा नुकताच केला असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती, आपल्या मिळणार्या रकमेची स्थिती तपासू शकता, आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर ते देखील तुम्हाला ऑनलाइन दिसेल.
- सर्व प्रथम,तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (क्लिक करा)
- वेबसाइट वर तुम्हाला Farmer Corner म्हणून एक पर्याय दिसेल त्या वर क्लिक करा.
- Farmer Corner वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला beneficiary status असा पर्याय दिसेल.
- तुम्हाला beneficiary status हा पर्याय निवडावा लागेल, आता तुम्ही आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक व मोबाईल नंबरद्वारेही येथून स्टेटस तपासू शकता.
टीपः – आता अर्जाची सर्व माहिती, केंद्र सरकारने पाठविलेली हप्ते आणि काही माहिती चुकीची असल्यास तुमच्या समोर दर्शविली जाईल.
जर आपण वर नमूद केल्याप्रमाणे आपली स्थिती तपासली असेल आणि आपली कोणतीही माहिती यात चुकीची असेल तर त्या सुधारण्यासाठी काही उपाय आहेत जे आम्ही खाली सांगत आहोत.
जर आपले फक्त नाव चुकीचे असेल, तर आपले नाव पीएम किसन अर्ज आणि आधार कार्डमध्ये भिन्न असेल तर आपण ते ऑनलाइन सुधारू शकता. या नावाशिवाय इतर काही चूक असल्यास आपण आपल्या लेखपालशी संपर्क साधून किंवा कृषी कार्यालयाशी किंवा नोडल अधिकार्याशी संपर्क साधून ती सुधारू शकता.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.