पॅन कार्डची स्थिती तपासण्याची प्रक्रिया अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. पॅन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर किंवा तुमच्या पॅनमध्ये समाविष्ट असलेली चुकीची माहिती अपडेट किंवा दुरुस्त करण्याची विनंती केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल. ह्या क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने PAN Card Status Online Check करू शकता. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने PAN Card Status Online कसे चेक करता येते या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.
PAN Card Status Check Online
Paermenant Account Number, ज्याला PAN म्हणून ओळखले जाते हा 10 अंकांचा एक प्रकारचा अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे जो आयकर विभागाद्वारे करदात्यांना प्रदान केला जातो. PAN क्रमांक मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता आणि दुरूस्ती सुद्धा ऑनलाइन केल्या जाऊ शकते. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिति तुम्ही ऑनलाइन किंवा तुमच्या नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरून संदेश पढवून देखील मिळवता येते.
PAN Card Status by UTI Website
तुम्ही UTI च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुमच्या PAN कार्ड ची स्थिति ऑनलाइन तपासू शकता त्याबद्दल आम्ही खाली संगितले आहे.
- वेबसाइट वर गेल्यानंतर तुम्हाला पावती क्रमांक, पॅन क्रमांक टाकावा लागेल.
- नंतर तुमची जन्म तारीख टाकावी लागेल
- आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल
- समोरील पृष्ठावर तुमच्या समोर तुमच्या PAN Card चे Status दिसेल.
PAN Card Status Check by Acknowledgement Number
तुमचे पॅन कार्ड वापरून केलेल्या व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
- सर्वात आधी तुम्हाला NSDL च्या वेबसाइट वर जावे लागेल.
- मुख्य पृष्ठावर, “PAN Card Status” पर्याय आहे. त्यावर क्लिक करा.
- पुढील चरणात, “अर्जाचा प्रकार” विभागात जा आणि “पॅन-नवीन किंवा विनंती बदला” हा पर्याय निवडा.
- कृपया दिलेल्या जागेत तुमचा पोचपावती क्रमांक द्या, जो 15 अंकी आहे.
- फक्त “सबमिट” बटण दाबा.
- पुढील पृष्ठावर पॅन कार्ड ची स्थिति तुमच्या समोर उघडेल.