नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकताच म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारा यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्री. उद्धव ठाकरे सरकार ने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे काय आहे हा निर्णय आज आपण या पोस्ट मध्ये सविस्तर पाहू.
आपत्ती व्यस्थापन विभागाचे मंत्री माननीय श्री. विजय वाडेट्टीवर हे म्हणाले की , “शेतकरी मित्रांनो नुकताच म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिठ तसेच वादळी वारे, या मुळे शेतकर्यांच्या शेट पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.”
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
केव्हा होणार नुकसान भरपाई चे पंचनामे?
महाराष्ट्रत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे श्री.वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते, यामध्ये झालेल्या निर्णायमद्धे ते म्हणाले की आम्ही पचनामे करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हा अधिकारी यांना दिले आहेत ते लवकरच या निर्देशची अमलबजावणी करतील.
हेही वाचा – या तारखेला जमा होतील किसान सन्मान निधि योजनेच्या 8 व्या हप्त्याचे पैसे
कोणत्या जिल्ह्यात होतील पंचनामे?
जानेवारी फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे गहू, हरभरा, द्राक्ष, मका, डाळिंब, भाजीपाला या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक, औरंगाबाद, बीड, सातारा जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.