नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण निंभोळीचा अर्क (Neem Seed Kernal Extract Marathi) कश्या प्रकारे तयार करायचा याबद्दल माहिती पाहणार आहोत कडुनिंब एक अतिशय मौल्यवान औषधी वनस्पती आहे पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये तसेच शेती क्षेत्रात याचा उपयोग हा नेहमीच होत आला. कडूनिंब या झाडाची मुळे,खोड,खोडाची साल,पाने,फुले,निंबोळी अर्क आणि तेल काढून शिल्लक राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे. निंभाचे झाड हे दीर्घायुषी आहे. (Neem Seed Kernal Extract Marathi)
निंभोळी अर्काचे फायदे काय आहेत? (Neem Seed Kernal Extract Marathi)
निंभोळी अर्क म्हणजेच कडुनिंबाचा ज्या बिया असतात त्या बियांपासून काढलेल्या अर्कालाच निंभोळी अर्क असे म्हणतात .कडू लिंबाचा झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फुलांचा मोहोर येत असतो आणि मे महिन्याच्या शेवटी-कशेवटी निंभोळी परिपक्व होऊन त्याचा संपूर्ण सडा झाडाखाली पडतो या निंभोळ्या गोळा करून त्यातील दगड-धोंडे आणि खडे वेगळे करून एखाद्या सुरक्षित ठिकाणी वर्षभर साठविता येतात. आणि या साठविलेल्या निंभोळी पासून वर्षभर गरज भासेल तेव्हा निंभोळी अर्क तयार करण्यासाठी तसेच निंभोळीची पेंड करण्यासाठी वापर आपण करू शकतो.
हेही वाचा- तेल आणि पेंढीचे भाव वाढल्याने सोयाबीन तेजीत- साठा असलेले शेतकरी फायद्यात
निंभोळीच्या झाडात म्हणजेच कडूलिंबात असलेले आझाडिरेकटीन हे द्रव्य कीटकनाशकाचे काम करते या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते आणि ते पानांमध्ये कमी असते शेतीमध्ये निंभोळी ला खूप महत्त्व प्राप्त झालेली आहे. निंभोळीचा कीटकनाशक बनविण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. निंबोळीत असणारा महत्वाचा अझाडिरेकटीन हा घटक कीटक सूत्रकृमी विषाणू आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोगात पडतो.
निंभोळीचे अर्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- कडुनिंबाच्या पूर्णपणे सुकलेल्या निंबोळ्या (पाच-सात) किलो
- चांगले आणि स्वच्छ पाणी 100 लिटर
- कपडे धुण्याची पावडर कमीत कमी शंभर ग्राम
- आणि गाळण्यासाठी कापड
हेही वाचा- शेंनापासून बनवा रंग आणि महिन्याला लाखो कमवा
निंभोळी अर्क कसा तयार करायचा?
निंभोळी पासून अर्क बनवण्याच्या वेग वेगळ्या पद्धती आहेत त्या पैकी काही आपण खाली पाहणार आहोत.
पद्धत १) – निंभोळ्या झाडाखालून वेचव्यात आणि त्यावरील साल काढून त्या उन्हात वाळू घालाव्यात. सुमारे 50 ग्रॅम अशा बीया घेऊन त्याची बारीक पूड करून(पूड मिक्सर मधून केली तरी चालेल) आणि त्या एका कपड्यात बांधून घ्याव्यात व तो कपडा एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा त्याने निंभोळीचा अर्क पाण्यात उतरतो हा अर्क भाजीपाला अथवा विविध पिकांवर फवारल्यास किडींचा बंदोबस्त आपण करू शकतो.
पद्धत २) – दोन किलो निंभोळ्या वाटून बारीक करून घ्या. आणि त्यामध्ये 15 लिटर पाणी टाकून ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे व दुसऱ्या दिवशी त्यास कापडाने गाळून घ्यावे व नंतर फवारणी करावी याद्वारे भुंगेरे व फळावरील पाने खाणाऱ्या अळ्या यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो.
फवारणी केव्हा करावी?
निंभोळ्याच्या अर्काची फवारणी ही साधारणत: संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी ४ च्या पुढे केलेली उपयुक्त ठरते.
निंभोळी अर्काचे काय फायदे आहेत?
- निंभोळी अरकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याला तयार करण्याचा खर्च हा अतिशय कमी असतो. कारण याला तयार करण्यासाठी लागणार्या वस्तु ह्या आपल्या घरातच सहज उपलब्ध होऊ शकतात.
- हा पुर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
- निंभोळी अर्क बनवणे आणि हाताळणे अगदी सोपे आहे.
- यामुळे जारी घटक कीटकांचा प्रतिबंध किंवा नियंत्रण होत असला तरीसुद्धा काही कीटकांसाठी फारसे हानिकारक ठरत नाही.
किड्यांवर निंभोळी अर्काचा काय परिणाम होतो?
- पिकांच्या पानांवर निंभोळी अर्काची फवारणी केल्या मुळे पिकांची पाने कडू होतात आणि अशी पाने कीटक खाणे टाळतात आणी उपासमारी मुळे त्यांचा मृत्यू होतो.
- निंभोळी अरकच्या कडू वासामुळे मादा कीटक पानांवर अंडी घालत नाहीत, त्यामुळे त्यांची पुढील पिढीच तयार होत नाही.
- निंभोळी अरकच्या फवारणी मुळे कीटकांत नपुसकता येते.
- पिकांचा वास कडू आल्यामुळे कीटक झाडांवर बसण्याचे टाळतात.