नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जुन ते सप्टेंबर या चार महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.
मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.जर हवामान खात्याचा हा पावसाचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा खूप मोठा फायदा होईल. कारण भारताची दोन तृतीयांश जनता ही फक्त शेतीवरच अवलंबून आहे. आणि कोरणा महामारी मुळे संकटात सापडलेला “शेतकरी राजा” सुखावेल.
ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने वर्तविला अंदाज
ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी भारतात सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर या चार महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी खूपच प्रसिद्ध आहे. दरम्यान, भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात याबाबत घोषणा होऊ शकते. तसेच एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असे संगितले आहे.
हेही वाचा – यांना शेती विकत घेण्यासाठी मिळणार सरकार कडून अनुदान
भारतात बरेच ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पेरणीची सुरुवात होते. यावर्षी जर मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचं शेत तयार करण्यासाठीही चांगलीच मदत होईल. याशिवाय शेतकर्यांना पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल. योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले पीकं उगवण्याची आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते. जर खरंच तसं झालं तर शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. अनेक भागात सध्या शेतकरी त्यांच्या शेतीला पेरणीसाठी तयार करत आहेत. दरम्यान, मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे.
हेही वाचा – शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना – ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया २०२१
अर्थव्यवस्था सुधारण्यास होईल मदत
पाऊस कमी-जास्त पडला तर त्याचा थेट परिणाम खेड्या गावात राहणाऱ्या शेतकर्यांवर पडतो. त्यामुळे पाऊस चांगला किंवा सामान्य स्वरुपाचा पडला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. कारण पावसाळ्यात पीकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. आणि पावसाच्या पाण्यातून ती गरज भरुन निघते. पीकांना चांगलं पाणी मिळाल्याने शेतकर्यांना उत्पन्न देखील चांगलं काढता येतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तर होतोच याशिवाय देशाची आर्थिक व्यवस्थाही सुधारण्यास मदत होते. कारण भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे तो शेतकर्यांवरच अवलंबून आहे.
उपयुक्त माहिती –
- महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
- शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
- महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
- किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- CSC Registration 2021 – Common Service Center
- PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?
- ग्राम उजाला योजना – फक्त १० रुपयात मिळेल LED बल्ब