नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप या करीता सन २०२०-२१ या वर्षासाठीची सुधारित तरतूद खर्च करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावे केली जाते. मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.
हेही वाचा – शेतकर्यांसाठी स्थापन होणार दहा हजार कंपन्या
या प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अटी
- अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
हेही वाचा – शेतकर्यांना नवीन ट्रॅक्टर साठी सरकार कडून मिळणार सव्वा लाखाची मदत
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना GR
आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कळविण्यात येत आहे की, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप करण्या करिता सन २०२०-२१ या वर्षातील सुधारित तरतुदीपैकी उपरोक्त वाचा येथील शासन ज्ञापन, दिनांक ०८ जानेवारी, २०२१ अन्वये रुपये १२,५०,००,०००/- इतका निधि वितरीत करण्यात आलेला आहे.
आता, अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) वितरीत करण्यात आलेली सुधारित तरतुदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये १२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पन्नास लक्ष फक्त) खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता देण्यात येत आहे, याबाबतचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
(रुपये हजारात) अ.क्र. अनुसूचित जाती आणि नवबौध्द
अर्थसंकल्पित सुधारित तरतूद खर्च करण्यासाठी भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप तरतूद रुपये मान्यता देण्यात येत (कर्मवीर दादासाहेब गायकवाड रुपये सबळीकरण व स्वाभिमान योजना) रुपये १. २२२५, ५०,००,००
सदर तरतूद खर्च करण्यासाठी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी व संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे. नियंत्रण अधिकारी यांनी उपरोक्त विवरणांतील रकाना ४मधील तरतूद खर्च करावी. सदर तरतूद खर्च झाल्यावर त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता शासनास सादर करण्यात यावे. प्रस्तुत योजनेवर होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून सन २०२०-२१ या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून भागविण्यात यावा
उपयुक्त माहिती –
- महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
- शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
- महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
- किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- CSC Registration 2021 – Common Service Center (नवीन रजिस्ट्रेशन अश्या प्रकारे करा फक्त ५ मिनिटात)
- PMKisan – Installment Payment Stopped by State – म्हणजे काय? काय करायला पाहिजे?
- ग्राम उजाला योजना – फक्त १० रुपयात मिळेल LED बल्ब
- शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
- ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद देत आहे ७५% अनुदान – लवकर अर्ज करा