नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा अस्मानी पावसाच्या संकटाचा इशारा पुण्याच्या हवामान खात्यान दिला आहे, मागची वर्षी पासून कोरोंना आणि पाऊस या दोन गोष्टींमुळे राज्यात खूप मोठे नुकसान होता आहे.
आणि आता सुद्धा हवामान खात्यान दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा पावसाचे संकट येण्याची शक्यता आहे .कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला असतांना आता कुठे पावसाने दार ठोठावलेले दिसते, पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्यता असल्याच हवामान खात्या कडून सांगण्यात आलेल आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. आणि राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही असे संगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी जपून ठेवावा अश्याही सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्राकडून येणारे बाष्प वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्रित येणार असल्यानं होणाऱ्या आंतररक्रीयेच्या प्रभावामुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. यामुळे 18 ते 21 या तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
देशात महाराष्ट्रासह मध्ये तसेच प्रदेशमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.”
खालील ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
- पुण्यासह आसपास चा भाग
- मध्य महाराष्ट्रात नाशिक तसेच जळगाव चा भाग
- मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी
- विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
- कोकणातील रत्नागिरी आणि रायगड इथंही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
- दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.