नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार ने सन २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे. (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2021 ) आणि या योजने अंतर्गत शेतकर्यांना ५० हजार रुपये ते १ लाख रुपये पर्यन्त आर्थिक मदत राज्य सरकार कडून मिळू शकते.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी आणि त्यांचे राहणीमन उंचवावे या साठी राज्य सरकार नेहमी तत्पर असते. आणि केंद्रात सुद्धा सन २०२२ पर्यन्त शेतकर्यांच आर्थिक दुप्पट करण्याचा विडा हाती घेतलेला आहे. राज्यातील जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या साठी सरकार ने सन २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे. Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2021 आणि या योजने द्वारे शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
योजनेचे नाव
|
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
|
सुरू झाल्याचे वर्ष
|
२०१८-१९
|
मिळणारी मदत
|
५० हजार रुपये ते १ लाख
|
योजना राबविणारे राज्य
|
महाराष्ट्र
|
योजनेचा कालावधी
|
साधारणत: ३ वर्ष
|
शेतकर्यांकडे जमिनीचे किती क्षेत्रफळ असावे ? Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2021
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्या कडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. तर, कोकण विभागासाठी ही अट शिथील करण्यात आलेली आहे आणि तेथील शेतकर्यांकडे 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ त्यांना दिला जातो. कोकणातील जास्तीत जास्त जमीन धारणा मर्यादा 6 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने अंतर्गत लाभार्थी शेशेतकर्यांना उपलब्ध क्षेत्रात एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड सुद्धा करता येते त्यासाठी दूसरा कोणता निकष नाही. आणि राज्य शासनाच्या इतर फळबाग योजनेंचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी पात्रता काय आहे?
- सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असणं आश्यक आहे.
- शेतकऱ्याचं कुटुंब जर फक्त शेतीवरच अवलंबून असेल त्यांना प्रथम प्राधान्य राहील.
- अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना सुद्धा या योजनेत प्राधान्य दिले जाईल.
शेतकर्यांना करवयाची कामे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने अंतर्गत शेतकर्यांना जमीन तयार करणे, माती शेणखत तसेच खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खतांचा वापर तसेच अंतर्मशागत करणे. ही कामे शेरकर्यांना करावी लागणार आहेत.
शासनाचे काय योगदान राहील ?
शासनाकडून खड्डे खोदणे, कलमंची लागवड लागवड करणे, त्यांचे संरक्षण, नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासाठी शासन अर्धसहाय्य करते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअतंर्गत फळबाग लागवड करायची असल्यास त्याचा कालावधी हा 1 मे 30 नोव्हेंबर दरम्यानच आहे. योजना यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार,तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीस विभागीय कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, रोपवाटिकाधारक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या शासनाद्वारे सोपवण्यात आल्या आहेत.
योजनेत कोण-कोणती पिके समाविष्ट आहेत?
नारळ, काजू, डाळिंब पेरु, मोसंबी, संत्री, कांदा, सीताफळ, लिंबू, जांभूळ, फणस, आवळा, चिंच, अंजीर, आंबा. इत्यादि फळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
शेतकर्यांना मिळणार ३ टप्प्यात अनुदान
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने अंतर्गत शेतकर्यांना ३ टप्प्यात अनुदानाची मदत किंवा रक्कम मिळत असते. त्या पैकी तिसर्या वर्षी २० टक्के, दुसर्या वर्षी ३० टक्के आणि पहिल्या वर्षी ५० रक्कम ही शेतकर्यांना मिळत असते. फळांच्या प्रकारानुसार अनुदानाची किंमत ठरवल्या जाते. आणि दरवर्षी एप्रिल महिन्यात
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने साठी शेतकर्यांकडून अर्ज भरून घेतल्या जातात त्या साठी वेग-वेगळ्या माध्यमांच्या द्वारे जाहिरात कडून ही माहिती शेतकरी बांधवान पर्यन्त पोहचवली जात असते.