शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी । राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३८ कोटींचा निधि मंजूर । Krishi Yantrikikaran Yojana 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य सरकार च्या कृषी विभागाने वर्ष २०२०-२१ साठी ने ३८ कोटी रूपयांचा निधि मंजूर केला आहे. कृषि यांत्रिकीकरण योजना । krushi yantrikikaran yojana । krushi yantrikikaran yojana 2021 । krishi yantrikikaran yojana । krishi yantrikikaran yojana 2021

Krushi Yantrikikaran Yojana 2021
Krushi Yantrikikaran Yojana 2021

राज्य सरकारच्या कृषी विभागानं राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२०-२१ साठी 38 कोटी रूपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे. ३८ कोटी रुपयांपैकी 19 कोटी वितरीत करण्यास राज्य सरकार कडून मंजुरी देखील मिळाली आहे. यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान सरकार कडून उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा – पिकविमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाइल वरु

 

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं हा ३८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर त्यापैकी 19 कोटी रुपये वितरीत करण्यास राज्य सरकारने मान्यता सुद्धा दिली आहे. आणि याबाबतचा शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे.

कृषी अवजरांसाठी मिळणार अनुदान

सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर झाला असून यांत्रिकीकरणात वाढ होत आहे शेतीमधील मशागतीची कामं करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत आहे.

हेही वाचा – यांना शेती विकत घेण्यासाठी मिळणार शेतकर्‍यांकडून अनुदान

 

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश काय आहे?

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा भागामध्ये व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. हा कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मूळ उद्देश आहे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हा राज्य सरकारच्या कृषी विभागाचा उपक्रम आहे.

कोणत्या औजारांसाठी अनुदान मिळते?

  1. ट्रॅक्टर 
  2. पॉवर टिलर  
  3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे 
  4. बैल चलित यंत्र/अवजारे 
  5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे 
  6. प्रक्रिया संच
  7. काढणी पश्च्यात तंत्रज्ञान 
  8. फलोत्पादन यंत्र/अवजारे  
  9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे 
  10. स्वयं चलित यंत्रे

ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व महिला शेतकरी यांना 1 लाख ते 1.25 लाख तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 हजार आणि 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान सरकार कडून मिळते. (त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला येथे क्लिक करून मिळेल)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.