नमस्कार शेतकरी मित्रांनो, IFFCO न ३१ मार्च २०२१ पर्यंत डीएपी (DAP), एनपीके (NPK) आणि एनपीएस (NPS) या खतांच्या किंमतीमध्ये वाढ न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. IFFCO DAP rates, IFFCO NPK Rates
मागील काही दिवसांपासून इंधन दरात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सुद्धा महागाईची झळ सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांसाठी आता एक महत्वाची चांगली बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी खत पुरवठा कंपनी IFFCO ने ३१ मार्च २०२१ पर्यंत खतांच्या किमती कायम ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
IFFCO नं ३१ मार्च २०२१ पर्यंत डीएपी (DAP), एनपीके (NPK) आणि एनपीएस या खतांच्या किंमतीमध्ये एक रुपया सुद्धा वाढ न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. IFFCO ने केलेल्या महत्वाच्या घोषणेनुसार डीएपीची खताची किंमत ही 1200 रुपये, एनपीके खताची किंमत ही 1175 रुपये तसेच एनपीएस खतांची किंमत ही 1185 रुपये प्रती बॅग येवडी राहील. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी दरांमध्ये वाढ करणार नसल्याचं IFFCO कडून सांगण्यात आलं आहे. (IFFCO will not increase prices of DAP, NPK, NPS till 31 March.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा iffco कडून प्रयत्न
इफकोनं मागच्या वर्षीच्या रब्बी हंगामात देखील खतांच्या दरांमध्ये वाढ केलेली नव्हती. इफकोचे MD यू.एस. अवस्थी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुण ही माहिती दिली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याशीच निगडीत असा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलांच्या किमती आणि भारतातील वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय इफको कडून घेण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे.
भारतात IFFCO चे पाच प्लांट
इफकोचे भारतामध्ये 5 खताचे प्लांट आहेत. खतनिर्मिती क्षेत्रात इफको देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. इफकोने सामान्य विमा, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, खाद्यप्रक्रिया आणि जैविक शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन आपला नफा वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. गेल्या 54 वर्षांमध्ये इफको भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचं खत पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. इफको कडून भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या फॉस्फेटिकमध्ये 32.1 टक्के, नायट्रोजन खत निर्मितीत 21.3 टक्के योगदान देते. फॉर्चून 500 भारत कंपन्यांच्या यादीमध्ये इफको 57 व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – PM-KISAN योजनेत झाला मोठा बदल
यूरियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे.
भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी एम एस स्वामिनाथन यांच्या हरित क्रांतीनंतर (1965-66) यूरीयाचा वापर सुरु करण्यात आला होता. 1980 मध्ये जवळपास 60 लक्ष टन यूरिया वापरला जात होता. आणि 2017 पर्यंत यूरियाचा वापर तब्बल 3 कोटी टनापर्यंत पोहोचला आहे. 2018-19 मध्ये 320.20 लाख टन यूरीयाची विक्री झाली. तर, 2019-20 मध्ये 336.97 लाख टन यूरिया विकला गेला. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नीम कोटेड यूरियाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे. नीम कोटेड यूरियामुळे सामान्य यूरियापेक्षा प्रदूषण कमी प्रमाणात होते.
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – शेतातून जाणारे रस्ते रोकल्यास होऊ शकते कारवाई
हेही वाचा – महाभूलेख । अश्या प्रकारे पाहता येईल ऑनलाइन डिजिटल ७/१२
हेही वाचा – किसान सन्मान निधि योजेनेचा लाभ घेणर्या शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.