नमस्कार मित्रांनो, खुपश्या लोकांचे वेग-वेगळ्या बँकेच्या शाखेत Saving Accounts असतात, आपण अकाऊंट तर काढून ठेवतो पण त्याचा वापर कधी करत नाही. तुमचे सुद्धा कुठल्या बँकेत सेविंग अकाऊंट असेल आणि तुम्ही ते वापरत नसाल तर कृपया बँकेच्या शाखेत जाऊन ते त्वरित बंद करा नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
एकापेक्षा अधिक बँक शाखेमध्ये तुमचे जर सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या बँकेत खातं उघडले असेल आणि त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर ते खातं त्वरित बंद करणं खूप गरजेचं आहे. अर्थिक सल्लागारांच्या मते, वापरात नसलेलं किंवा बंद पडलेले बँक खाते (Bank Account) बंद करणं हे केव्हाही फायदेशीर ठरते. गरजेपेक्षा जास्त बँक खाती असल्यास ही बाब नुकसानदायी ठरू शकते.
हेही वाचा – PMKISAN 3 कोटी शेतकरी अजूनसुद्धा वंचित?
आपण जेव्हा नोकरी बदलतो किंवा नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थानांतरण करतो अशावेळी अन्य गरजांमुळे सेव्हिंग अकाऊंटसची संख्या सुद्धा वाढते. आणि त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सेव्हिंग अकाउंट्स असतील तर ते नुकसानदायी ठरु शकते. याबाबत अधिक माहिती घेऊ.
मिनिमम बॅलन्स ठेवणं गरजेचं
तुमच्याकडे खुपश्या बँकेचे सेव्हिंग अकाऊंट असतील तर तुम्हाला प्रत्येक अकाऊंट सुरू ठेवण्यासाठी त्यात कमीत कमी म्हणजे मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) ठेवणं गरजेचं असते. महिन्याला मिनिमम किंवा सरासरी बॅलन्स न ठेवल्यास बँक आपल्या पॉलिसीनुसार किंवा नियमांनुसार तुमच्या खात्यातून पैसे कापून घेऊ शकते. सर्वच बँकांच्या रेग्युलर सेव्हिंग अकाऊंटसाठी हा नियम लागू आहे. त्यामुळे तुमच्यासमोर फक्त दोनच पर्याय शिल्लक राहतात. त्यापैकी एक म्हणजे महिन्याला सरासरी बॅलन्स शिल्लक राहण्यासाठी ठराविक रक्कम सेव्हिंग खात्यात जमा ठेवणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे बँकेला चार्जेस चे पैसे कापू देणे.
डेबिट कार्डचे चार्जेस सुद्धा द्यावे लागतील
जर तुम्ही तुमचे अकाऊंट वापरत नसाल तरी देखील तुम्हाला डेबिट कार्डचे चार्ज (Debit Card Charges) हे प्रत्येक वर्षी द्यावे लागतील. बँक खाते उघडण्यासाठी कुठले ही वेगळे चार्जेस नसतात. मात्र बऱ्याच बँका (किंवा सर्वच) त्यांच्या डेबिट कार्डवर काही ठराविक चार्जेस आकारतात. ही फी वर्षाला 100 ते 500 रुपयांपर्यंत असू शकते. आणि तसेच काही बँका तुम्हाला फोनवर मेसेज करण्याचेही चार्जेस तुमच्या कडून वसूल करून घेतात. हा चार्ज सुद्धा दर तीन महिन्याला 30 रुपयांपर्यंत असू शकतो.
दंड भरा लागू शकतो
जर तुम्ही सेव्हिंग अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवू शकत नसाल तर तुम्हाला बँकेच्या नियमांनुसार दंड (Fine) भरावा लागतो. हा दंड वाचवण्यासाठी तुम्हाला खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणं गरजेचं असते. या किमान बॅलन्सची मर्यादा ही ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि मेट्रोसिटीमध्ये वेगवेगळी असते. आणि वेग-वेगळ्या बँकेचे दंडाची रक्कम हे वेग-वेगळे असू शकतात. जर तुम्ही दंड भरला नाहीत तर दंडाची रक्कम काळानुसार वाढत जाते. जर सतत 12 महिने बँक अकाऊंटमध्ये कोणतंही ट्रान्झेक्शन झालं नाही तर ते अकाऊंट इनएक्टिव्ह मानलं जाते आणि बंद सुद्धा पडू शकते.
मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.