दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडीलाचे नाव पांडुरंग आणि आईरचे नाव यशोदा होते त्यांचे घराने मूळचे वसईजवळ तर्खड या गावचे, या गावावरून त्यांचे आडनाव तर्खडकर पडले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ४ भाऊ होते. | Dadoba Pandurang Tarkhadkar Information in Marathi
dadoba pandurang tarkhadkar marathi mahiti |
{tocify} $title={Table of Contents}
दादोबांचे वडील प्रखर विठ्ठल भक्त होते त्यामुळे घरात धार्मिक वातावरण होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे प्राथमिक शिक्षण हे पंतोजीच्या शाळेत आले, इंग्रजी शिक्षण Bombay Native Education Society मध्ये झाले. शिक्षण घेत असतांनाच त्यांचा विवाह १८२८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी झाला. आणि १८३७ पासून त्यांनी नोकरीला सुरुवात केली.प्रमरभि ते जावरा नावाबचे शिक्षक होते. १८४० मध्ये एल्फिस्टन इंस्टीट्यूट मध्ये ते असिस्टेंट इंग्रजी टीचर म्हणून रुजू आले. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती पाहू.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे साहित्य
मोरोपंतच्या केकावली वर लिहिलेली त्यांची टीका “यशोदा पांडुरंगी” म्हणजे मराठी समीक्षेची सुरुवातच होय. त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र म्हणजे अव्वल इंग्रजी युगातील पहिले आत्मचरित्र होय. तरीही दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी जो भाग हस्तलिखित पूर्ण केला होता तो पांगारकर यांनी “विविध ज्ञानविस्तार” मासिकातून १९२८ ला प्रसिद्ध केला. पुढे अ.का.प्रियोळकर यांनी तो संपादुण त्यांच्या चारित्र्याच्या दृष्टीने त्यात भर घालून १९४७ मध्ये चरित्र व आत्मचरित्र या स्वरुपात प्रसिद्ध केला. त्यांना मराठी भाषेचे पाणिणी असे म्हणतात.
- मराठी भाषेचे व्याकरण
- विद्यार्थी लाभाविषयी
- मराठी नाकाशांचे पुस्तक
- यशोदा पांडुरंगी
- परमहंसिक ब्रम्हधर्म
- आत्मचरित्र
- शिशुबोध
- मराठी लघु व्याकरण
- धर्मविवेचन इत्यादि पुस्तके दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या विषयी थोडक्यात
संपूर्ण नाव | दादोबा पांडुरंग तर्खडकर |
टोपणनाव | मराठी भाषेचे पाणिणी |
जन्म | ९ मे १८१४ |
मृत्यू | १८८२ |
वडलाचे नाव | पांडुरंग तर्खडकर |
आईचे नाव | कशीबाई |
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे सामाजिक कार्य
१) मनावधर्म सभा – २२ जून १८४४ रोजी दादोबा पांडुरंग तर्खडकर व दुर्गाराम मंचारम यांनी सूरत येथे मनावधर्म सभेची स्थापना केली.
२) परमहंस सभा – ३१ जुलै १८४९ रोजी दादोबा पांडुरंग तर्खडकर व आत्माराम पांडुरंग तर्खडकर, मोरोबा, विनोबा, इत्यादिनी केली.
३)ज्ञानप्रसारक सभा – १८४८ मध्ये मुंबईत एल्फिस्टन कॉलेजात तेथील विद्यार्थिनी स्थापन केली. दादोबा त्याचे अध्यक्ष होते
- त्यांनी सहकारी पुस्तक समिति ही संघटना स्थापन केली.
- विधवा श्रमर्जन-विद्येच्या लाभाविषयी ही पुस्तके त्यांनी लिहिली.
- इंग्रजी शिक्षणामुळे नोकरी मिळाली तरी व्याकरणाच्या ७व्या आवरूतीच्या प्रस्तावनेत त्यांनी नमूद केले की मी मराठीला जननी प्रमाणे मानतो. आपल्या भाषेची शेवटपर्यंत सेवा केल्याशिवाय राहणार नाही.