भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिलं, असा अंदाज वर्तवला आहे. Maharashtra Hawaman Andaj
भारतीय हवामान विभागानं देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सगळीकडे सामान्य राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी प्रमाणात होईल, मात्र दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
{tocify} $title={Table of Contents}
देशातील शेतकरी खरिप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका अंदाजानुसार 20 कोटी शेतकरी खरिप हंगामात धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भूईमूग, ऊस, उडीद आणि तूर या पिकांची लागवड करत आहेत. खरिप हंगामातील शेती प्रामुख्यानं मान्सूनच्या पावसावर अवंलंबून असते. मान्सून सामान्य राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि उत्पन्न देखील चांगले येते. खरिपातील पिकांना पाणी द्यावं लागत नाही.
हे वाचा – पंजाब डख पाटील हवामान अंदाज जुलै 2021 {alertInfo}
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहिल. भारतीय हवामान विभाग ऑगस्ट महिन्याचा अंदाज जुलै महिन्याच्या शेवटी किंवा 1 ऑगस्टला जारी करेल. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस हरियाणा, पंजाब दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात अद्यापही पोहोचलेला नाही. या भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
8 जुलै नंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल
भारतात मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा दाखल झाला. त्यानंतर मान्सूननं गती पकडली होती. पुढील 7 ते 10 दिवसात मान्सून देशातील विविध भागापर्यन्त पोहोचला. यानंतर मान्सूनचा जोर कमी झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार 8 जुलैपासून बंगालच्या खाडीवरुन येणारं वारे सक्रिय होतील. त्यामुळे संपूर्ण देशात मान्सून 8 जुलैनंतर मान्सून सक्रिय होईल. महाराष्ट्र हवामान अंदाज
राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा, आणि अश्याच हवामान आणि शेती विषयक माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा. {alertSuccess}