परभणीचे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांचा हवामान अंदाज दिनांक 6 जुलै ते 20 जुलै. विश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे ठिकठिकाणी आगमण झाले. उद्या पासून पाउस वाढत जाणार. दणदणीत आगमण होणार व राहीलेली पेरणी या पावसावर होणार आणि पिकांना जिवदान भेटणार.
Punjab Dakh Patil |
{tocify} $title={Table of Contents}
6 ते 20 जुलै दरम्यान धो-धो पाऊस
राज्यात 6 ते 20 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो सर्वदूर पाउस पडणार.
सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल.
हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!
राज्यात मुसळधार पाउस पडणार ?
पंजाब डख पाटील यांच्या हवामान अंदाजानुसार दिनांक 12 जुलै 13,14,15, 16 जुलै या तारखेला राज्यात सर्वदूर धो-धो आणि मुसळधार पाऊस पडणार.
राज्यात 6 जुलै पासून पावसाला सुरवात होइल.7,8,9,10,11 राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. व 12,13,14,15,16,17 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल. हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.
पाऊस कोठे पडेल?
1) पूर्वविदर्भ
2) मराठवाडा
3) प.विदर्भ
4) दक्षिण महाराष्ट्र
5) प.महाराष्ट्र
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल. व राहीलेली पेरणी होइल.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
शेवटी हे अंदाज आहेत. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
लेखक – पंजाब डख पाटील
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
दिनांक – 6/07/2021
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार; मान्सून सक्रिय होणार?
- मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागामध्ये मान्सून चालू आठवड्याच्या अखेरीस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले आहे.
- जून ते सप्टेंबर या चार महिने राहणारा मान्सून २० जूनपासून दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतातील इतर भागांसह महाराष्ट्रातही दडी मारून बसला आहे.
- मान्सून दक्षिण, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व मध्य भारतामध्ये उद्या ८ जुलैपासून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.
- १२ जुलैपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात बंगालचे उपसागरवर मान्सून सक्रीय होण्याचे प्राथमिक संकेत देतात, ही माहिती एम. राजीवन यांनी ट्विट करुन दिली आहे.
- २४ तासांच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
- सोमवारपासून कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
- या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ जुलैपर्यंत विदर्भावर पावसाचा जोर कायम राहील.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि दररोज हवामान विषयक माहिती तसेच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}