महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. IMD च्या हवामान अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
{tocify} $title={Table of Contents}
महाराष्ट्र हवामान अंदाजानुसार IMD ने दिनांक 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज सुद्ध हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी महाराष्ट्र च्या हवामानाच्या अंदाजासाठी भारतीय हवामान विभागाचे अपडेटस पाहावेत, असं आवाहन हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार
भारतीय हवामान विभागानं Maharashtraa Hawaman Andaj वर्तविला त्या नुसार राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत नागरिकांना कळवण्यात आलं आहे.
14 जुलै ला पावसाची स्थिति
भारतीय हवामान विभागानं Maharashtra Hawaman Andaj सांगितलं त्या नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अॅलर्ट जाहीर केला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलक्या प्रमाणात पाऊस होईल, असा Maharashtra Hawaman Andaj वर्तवण्यात आला आहे.
हे वाचा – पंजाब डख हवामान अंदाज (राज्यात होणार मुसळधार पाऊस)
15 जुलै रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांनाऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि पालघर या राज्यांना Maharashtra Hawaman Andaj नुसार येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्र हवामान विभागा मार्फत वर्तवण्यात आली आहे.
16 जुलै ला पावसाची स्थिति
Maharashtra Hawaman Andaj नुसार दिनांक 16 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात हलक्या ते माध्यम स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
17 जुलै ला पावसाची स्थिति
हवामान विभागानं 17 जुलै रोजी राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला आहे तर सातारा, कोल्हापूर आणि रायगडला येलो अॅलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा Maharashtra Hawaman Andaj अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि अश्याच प्रकारच्या हवामान विषयक माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}