भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येत्या 5 दिवसात महाराष्ट्रातील हवामान अंदाजाची स्थिती काय राहणार आहे याविषयी माहिती दिली आहे. (Maharashtra Hawaman Andaj)
महाराष्ट्र हवामान अंदाज |
या वर्षी मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात अगदी वेळे अगोदर सुरु झाला, जून महिन्यात सुरुवातीच्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र, नंतर पावसानं चांगलीच दांडी मारली आहे, काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावरच पेरणी देखील केली होती. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येणार्या 5 दिवसात महाराष्ट्र हवामान अंदाज आणि स्थिति काय असेल या बद्दल ट्वीटर वर ट्वीट करून माहिती दिली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
हे वाचा – पंजाब डख हवामान अंदाज {alertInfo}
महाराष्ट्र हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्र हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.
राज्यात कोठे पाऊस पडेल?
हवामान विभागानं महाराष्ट्र राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात चांगला पाऊस होऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
गेला आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सिंधुदुर्गात सकाळ पासून संततधार सुरू असून किणारपट्टीच्या काही भागात पासवाचा जोर वाढला आहे. मालवण, कुडाळ आणि सावंतवाडीत दमदार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. गेले काही दिवस पावसाने काही प्रमाणात दडी मारली होती माञ आज सकाळ पासून चांगला पाऊस कोसळत असून अनेक ठीकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारे हवामान आणि शेती विषयक माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}