Pik Vima 2021 साठी संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई 2021 मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विमा कंपन्यांना कळवणे आवश्यक आहे. असे आवाहन शेतकर्यांना करण्यात आले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
पीक विमा 2021
भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक आणि नैसर्गित संकटात नुकसान झाल्यास दिलासा मिळवा यासाठी सन 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली होती. Pik vima 2021 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेल्या पिकाचं नुकसान झाल्यास विमा परतावा देण्यात येतो. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे Pik vima योजनेचा अर्ज आणि प्रीमिअम ज्या शेतकर्यांनी भरलेला आणि त्यांचे पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाले आहे अश्या शेतकर्यांना या बाबत कळवण्याचे आवाहन राज्य सरकार ने दिले आहेत.
नुकसान झाल्याची माहिती देण्याचे आदेश
खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण भारतभर राबवण्यात आली होती 23 जुलै ही पीक विमा 2021 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विमा कंपनी ला देणे आवश्यक आहे.
पीक विमा 2021 साठी संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार नुकसान झालेले पीक व क्षेत्र घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र यांचा तपशिल कळविणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची माहिती ही 72 तासाच्या आत द्यावी, असं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आल आहे. आणि अधिक महितीसाठी शेतकर्यांनी तात्काळ जवळच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच राज्य सरकार ने प्रशासनाला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत.
पीक विमा कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक
नुकसान ग्रस्त शेतकर्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीला कळवने आवश्यक आहेत त्यासाठी आम्ही पीक विमा कंपन्यांचे जिल्हयानुसार टोल फ्री क्रमांक खाली देत आहोत, तुम्ही त्या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहायला नको. {alertInfo}