मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी देशातील लोकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असते. रेशन कार्ड योजने मार्फत देशातील कोट्यावधी लोकांना सरकार कडून मोफत धान्य पुरविल्या जाते. असे असून सुद्धा बरेच लोक या सरकारी योजनांचा गैरवापर घेतात. असे सरकारच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे सरकार ने अश्या लोकांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे. हा नियम काय आहे आणि कोण कोणत्या लोकांचे रेशन कार्ड सरकार कडून बंद केल्या जातील या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी. (Ration Card Update 2023)
ज्या लोकांची पात्रता नाही तरी सुद्धा ते सरकार कडून मोफत रेशन कार्ड चा लाभ घेत आहेत. या कारणाने असंख्य पात्र आणि गरजू लोक मोफत रेशन पासून वंचित राहत आहेत. सरकारने अश्या लोकांच्या विरोधात कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार ने नवीन नियम लागू केले आहेत जे लोक या नियमात बसतील अश्याच लोकांना या पुढे मोफत रेशन चा लाभ घेता येईल.
Ration Card New Update 2023
जे लोक आपल्या रेशन कार्ड वर मोफत रेशन घेण्यास पात्र नाहीत अश्या लोकांना त्यांचे रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन सरकार ने केले आहे. स्वत: रेशन कार्ड जमा केले नाही तर खाद्य विभागाकडून कारवाई करण्यात येईल आणि अश्या लोकांचे रेशन कार्ड रद्द केल्या जाईल.
आपले रेशन कार्ड जमा करण्यासाठी अर्ज डाऊनलोड करा
ही कारवाई होणार
सरकार च्या या नवीन नियमांनुसार जर अपात्र लोकांनी आपले रेशन कार्ड जमा केले नाही तर खाद्य विभागाकडून कारवाई करण्यात येऊन असे रेशन कार्ड अपात्र समजल्या जातील आणि ते रद्द केल्या जातील. अश्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल आणि आतापर्यंत त्यांनी घेतलेले संपूर्ण राशन परत घेतल्या जाईल.
नवीन निकष काय आहे?
सरकार ने जारी केलेल्या नवीन निकशा नुसार ज्या लोकांनी स्वत: च्या कमाईतून विकत घेतलेला 100 चौरस मिटर आकाराचा फ्लॅट/दुकान/जागा, तसेच संपूर्ण कुटुंबाची वार्षिक मिळकत 2 लाखापेक्षा जास्त असेल अश्या लोकांना आपले रेशन कार्ड तहसील मध्ये जमा करायचे आहे.
मित्रान्नो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp वर नक्की फॉलो करा.