मित्रांनो, नुकताच अशी बातमी समोर आली होती की Reserve Bank of India UPI शुल्कामध्ये बदल करीत आहे. आणि यूपीआय द्वारे केल्या जाणार्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. या बाबत आजच वित्त मंत्रालयाने नवीन आदेश जारी केला आहे हा आदेश काय आहे? या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.
वित्त मंत्रालयाने आदेश जारी करत सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे या आदेश मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या पुढे UPI द्वारे केल्या जाणार्या व्यवहारावर कुठलेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी ट्वीट करत “UPI हा भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि लोकांसाठी तो अत्यंत सोयिस्कर आहे तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेत UPI चे खूप मोठे योगदान आहे म्हणून असा निर्णय घेण्यात आला की UPI च्या व्यवहारावर या पुढे कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही” ही माहिती दिली.
UPI काय आहे?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की UPI ही Real Time Payment System आहे. या द्वारे एका बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात कुठलाही विलंब न लावता पैसे हस्तांतरित केल्या जातात. विशेष म्हणजे UPI ही 24 तास चालणारी सेवा आहे.
UPI प्रणाली द्वारे पैसे Transfer करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल फोन मध्ये UPI, Phonepe, Googlepay सारखी अॅप्लिकेशन डाऊनलोड करावी लागतील यासाठी तुमच्या बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम आणि Whatsapp वर नक्की फॉलो करा.