मित्रांनो, अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पतूर तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. आगीखेड, खमखेड आणि परडी शिवारात जोरदार वादळी वार्यासाह पावसाने हजेरी लावली.
शेतकर्यांच्या कांदा, लिंबू, आंबा या पिकांना खूप मोठा फटका बसला आहे. वार्याचा वेग जास्त असल्याने रस्त्यावरची झाडे सुद्धा खाली पडली. व्यापर्याला माल देण्या इतपत ही शेतात पीक उभ राहिलेलं नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसाळा दूसरा दिवस उघडला तरी प्रशासनाला जाग नाही प्रशासनाच्या कुठल्याही अधिकार्याने या ठिकाणी भेट दिली नाही. अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.
राज्यात व जळगाव खांदेश रावेर तालुक्यातील केळी ही संपरून जगभर प्रसिद्ध आहे सर्वात जास्त उत्पन्न सुद्धा या क्षेत्रात आहे मात्र अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या केळीची वारंवार नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी पर्याय म्हणून हळद उत्पादनकडे वळले आहेत. जळगाव जिल्ह्यात अंदाजे 200 एकर च्या वर हळदीची लागवड शेतकर्यांनी केळी आहे. मात्र पाहिजे तसा नफा मिळत नसल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.