New Income Tax Rule: मित्रांनो, 2023 च्या अर्थसंकल्प घोषणेमध्ये केंद्र सरकारने नवीन कर पद्धत स्वीकारलेल्या करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना प्राप्तिकर स्लॅबमधील बदलांसाठीची घोषणा केली होती. त्यावेळेस त्या म्हणल्या होत्या की, नवीन कर प्रणाली अंतर्गत करपात्र उत्पन्न 3 लाख रुपये करण्यात आले आहे.
याचाच अर्थ असा आहे की ज्याचे वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अश्या लोकांना आयकर भरावा लागणार नाही. आणि हा लाभ फक्त जो व्यक्ति नवीन कर प्रणाली स्वीकारील त्याच्यासाठीच उपलब्ध असेल. या नवीन कर प्रणाली मुळे कर दात्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नवीन कर प्रणाली अंतर्गत, जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये असेल तर त्याला कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीत बदल करताना 7 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न जाहीर केले होते.
नवीन कर प्रणाली अंतर्गत, सरकारने 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करातून सूट दिली आहे. 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्या मागचे सरकारचे उद्दिष्ट मुख्य उद्दीष्ट म्हणजे की अधिकाधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारावी.