शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या हातकणंगले या तालुक्यातील 1 हजार 81 शेतकर्यांना राज्य शासनाकडून 87 लाख 59 हजार 536 रुपयाची Nuksan bharpai 2023 मंजूर झाली आहे.संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर ही Nuksan Bharpai ची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. ही रक्कम शेतकर्यांना लवकर मिळावी म्हणून खूप दिवसापासून राज्य शासनाचा पाठपुरावा केला जात होता.
गेल्या वर्षी परतीच्या अवकाळी पावसाने ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातील पिकांना चांगलाच तडाखा दिला होता आणि त्यामुळे खरीप हंगामातील भुईमुंग, सोयाबीन, भाजीपाला तसेच फलपिके यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसनाची कृषि, महसूल, ग्रामविकास विभागातील अधिकार्यांनी पाहणी केली होती. नुकसनाचे पंचनामे करून त्याचा अहवाल तत्काळ शासनाकडे पाठवण्यात आला होता.
त्यानुसार राज्य सरकार ने या गोष्टीची दाखल घेत उपाय योजना देखील सुरू केल्या होत्या. आणि आनंदाची बातमी म्हणजे तालुक्यातील ३७८ हेक्टर क्षेत्रामधील १ हजार ८१ शेतकऱ्यांना ५७ लाख ५९ हजार ५३६ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsapp नक्की फॉलो करा.